फलटणमध्ये गाडीची काच फोडून आठ लाखाची चोरी - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, October 8, 2018

फलटणमध्ये गाडीची काच फोडून आठ लाखाची चोरी



सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क

फलटण :फलटण मध्ये  गाडीची काच  फोडून आठ लाखाची चोरी करण्यात आली असून  ही घटना भर दुपारी एक वाजता फलटण  येथील  गजबजलेला असलेल्या  रिंगरोडवर घडली आहे.


घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार नामदेव रामदास होले  रा .पणदरे होलेवस्ती ता.बारामती जि.पुणे हे सेंद्रिय खत तयार करुन विक्री करणे हा व्यवसाय  करतात. त्यांनी बारामती येथील अॅक्सीस बॅकमधून काढलेली रोख रक्कम रुपये आठ लाख काढले होते ते सातारा येथे फलटण मार्गे निघाले असताना मोबाईल शॉपीमध्ये मोबाईलचा कव्हर घेण्यासाठी थांबले असता सफारी गाडी क्र. एमएच 42 एच 6830 या गाडीतुन दुपारी 1 वाजता रिंगरोड फलटण येथे थांबले असताना. रॉयल प्लाझा येथील रस्त्याच्या कडेला उभे केलेल्या गाडीच्या ड्रायव्हर बाजूची काच फोडून क्लिनर बाजूकडील शीट खालच्या बाजूस हिरव्या रंगाच्या पिशवीत आठ लाख रुपये ठेवलेले पैसे चार चोरांनी मिळून चोरल्याची घटना घडली आहे. हे चोर बारामती पासून होले यांच्या मागावर होते. चोरी करण्यापूर्वी एका चोरट्याने रस्त्याने जाणाऱ्या एका खाजगी बसला गाडी आडवी मारून बसचा वेग कमी करून ट्रॅफिक जाम करून वाद घालण्याचा प्रयत्न केला होता.  सदर चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असुन रात्री उशिरापर्यंत फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment