फलटण येथे भरदाव टाटा डंपरने दिलेल्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, October 9, 2018

फलटण येथे भरदाव टाटा डंपरने दिलेल्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू


सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क  


फलटण :- शहरातुन भरधाव वेगाने आलेल्या टाटा डंपर गाडीने दुचाकीवरून निघालेल्या शिक्षकास मागून धडक देऊन अंदाजे 70 ते 80 फूट फरफटत नेहून गंभीर जखमी केले. या अपघातात जखमी झालेल्या शिक्षकाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 


घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदल येथील शिक्षक रामदास राजाराम भोसले अंदाजे वय 45 रा .अक्षत रेसीडेंसी, जाधववाडी फलटण मूळ गाव मठाचीवाडी गोखळी पंचबीगा ता. फलटण हे आज सायंकाळी शाळा सुटल्यावर फलटण येथुन सायं 5 च्या सुमारास भाजी घेऊन अक्षत रेसीडेंसी, जाधववाडी येथे राहत्या घरी यामा क्रुक्स एम एच 11 ऐ डी 2874 या दुचाकीवरून निघाले असता शासकीय विश्राम गृहजवळील गिरवी नाकाकडे जाणाऱ्या वळणावर माळजाई कडून प्रसाद स्टोन क्रशर नाव असलेल्या भरदाव वेगात आलेल्या टाटा डंपर क्र एमएच 11 ऐ एल 6543 गाडीने डाव्या बाजूने पाठीमागील बाजूकडून दुचाकीस जोरदार धडक देऊन अंदाजे 70 ते 80 फूट फरफटत नेहले या अपघातात भोसले हे गंभीर जखमी झाले होते. या अपघातानंतर डंपर गाडी चालक घटनास्थळावरून फरार झाला. गंभीर जखमी शिक्षक रामदास राजाराम भोसले यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचें निधन झाल्याचे डॉक्टर यांनी सांगितले. 


रुग्णांना आपत्कालीन वेळेत तत्काळ सेवेसाठी उपलब्ध होणारी रुग्णवाहिका 108 क्रमांकावर फोन करून सुमारे अर्धा तास उशीरा आली. जखमी शिक्षक रामदास भोसले हे सुमारे पंचवीस मिनिट रस्त्यावर पडून होते. त्यांना खाजगी रुग्णवाहिकामधून खाजगी रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर पाच ते दहा मिनिटांनी आपत्कालीन सेवेसाठी नेमण्यात  आलेली रुग्णवाहिका घटनास्थळी आली. रात्री उशिरापर्यंत उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


No comments:

Post a Comment