चोराडेत जुगार अड्ड्यावर छापा, ऐंशी हजाराचा ऐवज जप्त - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, October 20, 2018

चोराडेत जुगार अड्ड्यावर छापा, ऐंशी हजाराचा ऐवज जप्त



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
औंध : चोराडे ता.खटाव येथे बेकायदेशीरपणे तीन पानी जुगार खेळणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा मारून रोख  १२ हजार ६७० रुपयांसह सुमारे ऐंशी हजाराचा ऐवज जप्त करून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत औंध पोलीस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी, चोराडे गावच्या हद्दीत नांगरे मळा येथे काही जण बेकायदेशीरपणे तीन पानी जुगार खेळत असल्याची माहिती औंध पोलिसांना मिळाली त्यानुसार शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास औंध पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला असता,उमेश किसन लोकरे वय ३५,प्रमोद महादेव पिसाळ वय ४२, जगन्नाथ बापू चव्हाण वय ३६,बाळकृष्ण रघुनाथ बामणे वय ३८, प्रविण भगवान मोहिते वय ३४, अविनाश आण्णा पवार ,राजेंद्र बाबूराव चव्हाण सर्व रा.चोराडे यांच्या वर  गुन्हा दाखल करून त्याठिकाणी असणारे तीन पानी जुगाराचे साहित्य,रोख १२६७० रुपये,३६हजार ५००रुपये किंमतीचे पाच मोबाईल,एक मोटर सायकल असा एकूण ७९हजार१७०रुपयांचा ऐवज औंध पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबतची फिर्याद प्रशांत पाटील यांनी दिली आहे. अधिक तपास सपोनि सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार  प्रशांत पाटील, सुभाष काळेल,कुंडलिक कटरे,पोळ यांंनी कारवाईत सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment