फलटण :- फलटण नगर परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यास ठेकेदारांने दमदाटी व जीवे मारणेची धमकी दिल्या प्रकरणी कामगारांनी आज काम बंद आंदोलन करून निषेध व्यक्त केला.
या बाबत मुख्यधिकारी यांना फलटण शहर म्युनिसिपल कामगार संघटना यांच्या वतीने निवेदन देण्यात आले असून निवेदनात म्हंटले आहे की, दि 16 रोजी फलटण नगर परिषदेच्या बांधकाम विभागात ठेकेदार सचिन भोसले हे कामा व्यतिरीक्त दिवसभर बसुन असतात त्यांना कामा व्यतिरिक्त न थांबण्याच्या सुचना नगर अभियंता पंढरीनाथ साठे यांनी दिल्या होत्या. सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान नगर अभियंता पंढरीनाथ साठे आपल्या दालनात कार्यालयीन कामकाज करीत असताना ठेकेदार सचिन भोसले हा तेथे आला व तुला मस्ती आली आहे का? बाहेर ये बघुन घेतो असे म्हणुन अर्वाच्य भाषा बोलत जोरजोरांने अंगावर धावुन येवु लागला व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली माझे बिल दाखल करताच काम न पहाता बिलावर सही करावी लागेल असा सज्जङ दम ही ठेकेदार भोसले याने यावेळी दिला. सदरचा आरडाओरडा ऐकून बांधकाम विभागातील अभियंता अभिजीत सोनवले, मोईद्दीन तडवी, अधिकारी सुरेंद्र काळबेरे, शिपाई सुनिल गवळी यांनी ठेकेदार भोसले याला अडविण्याचा प्रयत्न केला असता भोसले यांनी कार्यालयीन कागदपत्रे अस्ताव्यस्त करीत शासकीय कामकाजात अडथळा आणला तसेच कार्यालयीन कामकाज संपल्या नंतर साठे घरी जात असताना ठेकेदार सचिन भोसले यांने त्यांच्या गाडीची चावी काढुन घेवुन तुला आता सुट्टी नाही तुला बघुन घेतो अशी धमकी दिली साठे यांना भोसले यांच्याकडुन जीवीतास धोका निर्माण झाला आहे.
एकंदरीत ठेकेदार भोसले यांच्या वागण्यामुळे नगर परिषदेच्या कर्मचारांचे मानसिक धैर्य खचले आहे तरी ठेकेदार भोसले यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी फलटण शहर म्युनिसिपल कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. शासकीय कामात अडथळा आणणे, शासकीय कर्मचाऱ्यांस जीवे मारण्याची धमकी देणे या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment