चोपडी सोसायटीत १४ लाखांचा अपहार, गुन्हा नोंद - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, October 23, 2018

चोपडी सोसायटीत १४ लाखांचा अपहार, गुन्हा नोंद


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
पाटण: पाटण तालुक्यातील चोपडी येथील  विकास सेवा सोसायटीत 14 लाखांचा अपहार झाल्याप्रकरणी १२ जनांवर पाटण पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे, या गुन्ह्यातील सोसायटीचे चेअरमन, सचिव व संचालक मिळून 10 संशयितांना पाटण पोलिसांनी सोमवारी अटक केली, 
याबाबत पाटण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पाटण तालुक्यातील चोपडी विकास  सेवा सहकारी सोसायटी ची दरवर्षी दोन कोटींची आर्थिक उलाढाल होते मात्र काही संशयास्पद बाबीमुळे सभासदांनी सहकार निबंधकांकडे सोसायटीच्या शासकीय लेखा परीक्षणाची मागणी केली होती त्यासाठी अशा नलावडे यांची शासकीय लेखा परीक्षक म्हणून नेमणूक झाली, त्यांनी सोसायटीचे सर्व आर्थिक कागदपत्रे तपासली,
त्यानंतर 2012 ते 2015 दरम्यान झालेल्या पीक कर्जाच्या देवाणघेवाणी मध्ये तब्बल 14 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे लेखापरीक्षकांच्या निदर्शनास आले, त्यामुळे याबाबत शासकीय लेखा परीक्षक आशा नलावडे यांनी पोलिसात फिर्याद दिली, तपास अधिकारी सहाय्यक फौजदार संतोष कोळी यांनी प्राथमिक चौकशीची प्रक्रिया पूर्ण केली त्यानंतर सोसायटीच्या चेअरमन सचिव व संचालक मिळून एकूण बारा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्यात 10 संशयितांना पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे, दरम्यान चोपडी सोसायटीमधील या अपहाराची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे,

No comments:

Post a Comment