उदयनराजे, शिवेद्रराजेंसह ७५ समर्थकांवर गुन्हे दोन्ही बाजूकडील तिघा समर्थकांना अटक - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, October 23, 2018

उदयनराजे, शिवेद्रराजेंसह ७५ समर्थकांवर गुन्हे दोन्ही बाजूकडील तिघा समर्थकांना अटक


सातारा : सोमवारी भरदुपारी दारूच्या दुकानासमोर खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह समर्थकांमध्ये झालेल्या टशन नंतर शाहुपूरी पोलिस ठाण्यात एकूण दोन गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये खा. उदयनराजे यांच्यासह समर्थकांवर दोन तर आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह समर्थकांसह एक गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी कोणताही मुलाहिजा न बाळगता गुन्हे दाखल करत दणका दिल्यानंतर आज दुपारी दोन्ही बाजूकडील तीन जणांना अटक केली आहे.

शाहुपूरी पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार धनंजय कुंभार यांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रार दिली आहे. खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले, समीर माने, किशोर उर्फ तात्या शिंदे, संदीप शिंदे, राहुल गायकवाड, समीर खुटाळे, सूरज अवघडे, केदार राजेशिर्के यांच्याह 70 ते 75 जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हादंडाधिकारी यांचा सातारा जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदीचा आदेश लागू असताना संशयितांनी बेकायदेशीर जमाव जमवून आदेशाचा भंग केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थक रविंद्र ढोणे यांनी खा.उदयनराजे भोसले, समीर खुटाळे, सत्यजित खुटाळे, केदार राजेशिर्के, महेश शिंदे, मयुर चिकणे, पद्माकर खुटाळे यांच्याविरुध्द दुसरी तक्रार दिली आहे. दि 22 रोजी जुना मोटर स्टँड येथे तक्रारदार रविंद्र ढोणे  दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास स्वत:च्या देशी दारुच्या दुकानात बसले होते. त्यावेळी संशयित सर्व दुकानासमोर आले. तक्रारदार यांना दुकानातून बाहेर बोलवण्यात आले. ‘दुकान बंद कर नाही तर फोडेन. मी दुकान पाडायलाच आलोय. तु गाडीत बस व निघून जा नाहीतर तुझी गाडीपण फोडीन. तुझ्या शिवेंद्रला बोलव, कोणीबी येवू दे. तुझ दुकान पाडणारच. तु दुकान बंद कर नाही तर तुला खल्लास करीन,’ अशी दमदाटी व धमकी दिली असल्याचे रवि ढोणे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

सोमवारी रात्री एकूण दोन गुन्हे दाखल झाल्याने दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. एक वर्षापूर्वी दोन्ही नेत्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांवर काही जणांना अटक तर बहुतेकजण पसार झाले होते. दरम्यान आज दुपारी शाहूपुरी पोलिसांनी दोन्ही बाजूकडील तिघा जणांना अटक केली आहे.  

No comments:

Post a Comment