विडणी येथे अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागेवर मृत्यू - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, October 10, 2018

विडणी येथे अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागेवर मृत्यू

सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क 

फलटण - आज रात्री फलटण -पंढरपूर महामार्गावर पवारवाडी शाळा नजीक  विडणी येथे ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीने पाठीमागून धडक दिल्याने पिंप्रद येथील दोघेजण जागेवरच ठार झाल्याची घटना घडली आहे.



घटनास्थळा वरून मिळालेली माहिती अशी की,आज रात्री फलटणवरून बरडकडे दुर्गादेवीची मूर्ती घेऊन ट्रॅक्टर  व ट्रॉली क्र एमएच-11-बिजी-869 निघाले होते त्यावेळी ट्रॅक्टर मधील डिझेल संपल्याने  चालकाने ट्रॅक्टर रस्त्यातच उभा होता केला होता.  रात्री 8:30 च्या सुमारास फलटणहुन पिंप्रदकडे दुचाकी क्र एमएच -11-बीएस-9612 निघालेल्या उमाजी खाशाबा मदने, वय -37 व हरी रामचंद्र पवार, वय 55 दोघेही राहणार- पिंप्रद ता. फलटण हे आपल्या राहत्या घराकडे निघाले असतात. महाड - पंढरपूर रस्त्यावर पवारवाडी शाळा विडणी नजीक रात्रीच्या अंधारात रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीस्वार  मागून जोरदार धडकल्याने दुचाकीवरून दोघेही जागीच ठार झाले.


No comments:

Post a Comment