आई उदे ग अंबे उदेच्या जयघोषात गुलाल खोबरे उधळून हजारो भाविकांच्या उपस्थितीत अपूर्व उत्साहात औंध येथील मूळपीठ डोंगरावर अष्टमी उत्सव साजरा. - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, October 17, 2018

आई उदे ग अंबे उदेच्या जयघोषात गुलाल खोबरे उधळून हजारो भाविकांच्या उपस्थितीत अपूर्व उत्साहात औंध येथील मूळपीठ डोंगरावर अष्टमी उत्सव साजरा.


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
औंध:-महाराष्ट्र तसेच उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मूळपीठनिवासिनी श्रीयमाईदेवीचा अष्टमीउत्सव येथील मूळपीठ डोंगरावर भाविकांच्या अलोट गर्दीत अपूर्व उत्साहात धार्मिक वातावरणात 'आई उदे,ग अंबे उदेच्या 'जयघोषात गुलाल खोबरे उधळून ,सासणकाठया नाचवून प्रसाद वाटून साजरा करण्यात आला.
  प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवानिमित येथील मूळपीठ डोंगरावरील श्रीयमाईदेवी,ग्रामनिवासिनी श्रीयमाईदेवी,राजवाडयातील कराडदेवी येथे नियमित विविध धार्मिक कार्यक्रमांचे मागील सात दिवसांपासून करण्यात आले . यामध्ये मंत्रपठन,मंत्रपुष्पांजली,महाआरती याबरोबरच कीर्तन व अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
  आठव्या दिवशी यमाई देवीचा अष्टमीउत्सव मूळपीठ डोंगरावर असल्याने सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी होती. यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर,पुणे,मुंबई सहराज्याच्या विविध भागातून तसेच कर्नाटक तसेच अन्य भागातून मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी मूळपीठडोंगरावर प्रचंड गर्दी झाली होती.
  दुपारी मूळपीठडोंगरावर अष्टमीउत्सवानिमित श्रीयमाईदेवस्थानच्या चीफ ट्रस्टी श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी व श्रीमंत चारूशीलाराजे पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते देवीच्या उत्सवमूर्तीचे षोडषोपचारे पूजन करण्यात आले. यावेळी पौरोहित्यपठन गणेश इंगळे यांनी केले. त्यानंतर वादयव्रूंदाची सलामी देऊन पालखी मंदिर प्रदक्षिणा सुरु झाली. यावेळी विविध गावच्या मानाच्या सासनकाठया श्रध्देने नाचविण्यात आल्या. यावेळी तेलभूते,,ढोल,सनई,हलगीवादकांनी तसेच कलाकारांनी आपली सेवा देवी चरणी सादर केली. पालखी प्रदक्षिणेवेळी मूळपीठ डोंगरावरील दत्त मंदिर,देवीच्या पादुका,घाटशिळ,बनबुवा तसेच पालखीने भेटी देऊन त्याठिकाणी मानाचे पानसुपारीचे विडे ठेवून पाच प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आल्या. यावेळी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी ,श्रीमंत चारूशीलाराजे पंतप्रतिनिधी हस्ते उपस्थित हजारो भाविकांना केळी,पेरू,काकडी आदी फळांचा प्रसाद वाटप करण्यात आले. त्यानंतर पुन्हा  देवीच्या उत्सवमुर्तीची पुन्हा मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर महाआरती करण्यात आली. वाद्यव्रूंदाची सलामी देण्यात आली.
   अष्टमीउत्सवानिमित माजी सभापती संदिप मांडवे,शिवाजी सर्वगोड, सपोनि सुनील जाधव,
हणमंत शिंदे,राजेंद्र माने,सरपंच नंदिनी इंगळे,उपसरपंच सचिन शिंदे,आब्बास आतार,प्रशांत खैरमोडे, उमेश थोरात,शंकरराव खैरमोडे, दिपक कदम,बापूसाहेब कुंभार,नंदुशेठ शिंदे, चंद्रकांत कुंभार,विनोद थोरात , दिपक कर्पे, शहाजी यादव
देवीचे सर्व मानकरी  ,भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट... सुमारे सव्वा तास मूळपीठ डोंगरावर पाच प्रदक्षिणा घालून केळी, डाळींब, काकडी,सफरचंद व अन्य फळे  तटबंदीवर बसलेल्या भाविक, महिला ,युवकांना वाटण्यात आली. यावेळी सर्वत्र आई उदे ग अंबे उदे चा जयघोष व गुलालाची उधळण सर्वांचे
आकर्षण बनले होते. यंदा आठ दिवसामध्ये सुमारे अडीच ते तीन लाख भाविकांनी औंध येथे भेट देऊन देवीचे दर्शन घेतले

No comments:

Post a Comment