माढा मतदारसंघातून रामराजे किंवा संजीवराजे यांना संधी देण्याची जोरदार मागणी - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, October 7, 2018

माढा मतदारसंघातून रामराजे किंवा संजीवराजे यांना संधी देण्याची जोरदार मागणी



विक्रम चोरमले/ फलटण - आगामी लोकसभा निवडणूकीसाठी माढा मतदारसंघातून मोर्चेबांधणीला सुरूवात झाली असून विविध लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरवण्याबाबतच्या आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर माण, फलटण, कोरेगाव, खटाव मधील प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर किंवा सातारा  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना संधी देण्यात  यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली. 

२००४ मध्ये लोकसभा मतदारसंघाची पुर्नरचना झाल्यावर माढा हा नविन लोकसभा मतदारसंघ उदयास आला.२००९ लोकसभेला माढा लोकसभा मतदारसंघातून माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांनी त्यावेळचे भाजप उमेदवार आणि सध्याचे सहकार मंत्री ना. सुभाष देशमुख यांचा दारूण पराभव केला होता. २०१४ लोकसभा निवडणूकीत माढा मतदारसंघातून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली तर सध्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे महायुतीचे उमेदवार होते. मोहिते-पाटील यांनी महायुतीचे सदाभाऊ खोत यांचा जवळजवळ २८ हजार मतांनी पराभव झाला.आणि विजयसिंह मोहिते-पाटील माढ्यातून लोकसभेवर निवडून आले होते.

 
२००८ साली निर्माण करण्यात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये सध्या सोलापूर जिल्ह्यामधील ४ आणि सातारा जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, सांगोला व माळशिरस विधानसभा मतदार संघ आणि सातारा जिल्ह्यातील फलटण व माण विधानसभा मतदार संघ येतात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेला माढा लोकसभा मतदारसंघात आगामी लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार हे अजूनही अस्पष्ट असले तरी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईत झालेल्या बैठकीत शरद पवार यांच्यासमोर सोलापूर जिल्ह्यातील चारी विधानसभा मतदारसंघातुन उमेदवार निश्चिती न झाल्यास विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर किंवा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर  यांना संधी द्यावी अशी जोरदार मागणी फलटण, माण, खटाव, कोरेगाव मधील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आली. यावेळी आमदार दीपक चव्हाण,जि.प.चे माजी अध्यक्ष  सुभाष नरळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फलटण शहर अध्यक्ष मिलिंद नेवसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विनायक पाटील, आस्था टाईम्स कार्यकारी संपादक  दादासाहेब चोरमले, जेष्ठ नेते सुभाषराव धुमाळ, शिक्षण समितीचे माजी सभापती  विजयकुमार लोंढे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा.बंडा गोडसे, खताळ सर, संदीप पोळ,जिल्हा परिषद सदस्य  मंगेश धुमाळ इ.नेते व कार्यकर्ते यांचे  शिष्ठमंडळ शरद पवार यांना भेटले व त्यांच्या वतीने वरील मागणी करण्यात आली.

No comments:

Post a Comment