सातारा लोकसभेसाठी विक्रमसिंह पाटणकर यांच्या नावाची चर्चा, - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, October 7, 2018

सातारा लोकसभेसाठी विक्रमसिंह पाटणकर यांच्या नावाची चर्चा,


संजय कांबळे,पाटण /सत्यसह्याद्री न्युज नेटवर्क 
राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये लोकसभा उमेदवारीसाठी निर्माण झालेला पेच प्रसंग पाहून जनतेतून आता असा सुर येत आहे कि, सातारा जिल्ह्यातील पक्षाचे जेष्ठ नेते माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभेची उमेदवारी द्यावी. अशी चर्चा पाटण तालुक्यात सुरू झाली आहे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी बाबतचे मेसेज रविवारी दिवसभर सोशल मीडियावर फिरत होते,  ठीक ठिकाणी याबाबतची चर्चा पाटण तालुक्याच्या राजकीय वर्तुळात वेगाने पसरत आहे,
माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर  हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांच्या  निकटच्या विश्वासू नेत्यांपैकी एक आहेत, काँग्रेसशी फारकत घेऊन पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती केली, त्या वेळेस सर्वात प्रथम पश्चिम महाराष्ट्रातून पवार साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले विक्रमसिंह पाटणकर हे एकमेव नेते होते, सातारा जिल्ह्यातील ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरीष्ठ नेते तर आहेतच शिवाय पक्षाच्या स्थापनेपासून पक्षासाठी रात्रंदिवस झटत आहेत. गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे पवार साहेबांच्या  विचारांची जोपासना करत आहेत. पवार साहेबांचे सुरवातीच्या काळातील अतिशय जवळच्या साथीदारांपैकी एक असून. सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत आहे. विक्रमसिंह पाटणकर हे विकासात्मक दृष्टीकोण असणारे आणि ग्रामीण भागातील जनतेशी नाळ असणारे नेते आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या  1999 च्या सरकारमध्ये  सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी केलेल्या कामाची आजही वाहवा होते. पाटणकर निश्चितपणे खासदारकीच्या माध्यमातून जिल्ह्यातील रोजगार,उद्योग, पर्यटन, शिक्षण व वर्षानुवर्षे रखडलेले धरणग्रस्त अभयारण्यग्रस्त सोडण्यासाठी प्रयत्न करतील, अशी जनतेला खात्री वाटते. यापूर्वीही माजी मंत्री पाटणकरांनी मंत्री पदाच्या कार्यकाळात आपल्या कामाचा ठसा संबंध महाराष्ट्रात उमटवला आहे. त्यांनी सातारा जिल्ह्यात व पाटण मतदारसंघात अनेक प्रकल्प, विकासात्म योजना आणल्या, तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला,  तरुणांना लघुउद्योग उभारण्यात मदत केली. पाटण सारख्या दुर्गम-ग्रामीण भागाचा कायपालट माजी मंत्री पाटणकरांमुळेच झाला. शिवाय त्यांच्या विषयी सातारा जिल्ह्यातील सर्वच नेत्यांना प्रचंड आदर आहे व जिल्ह्यातील कोणत्याही नेत्याशी त्यांचे मतभेद नाहीत. त्यामुळे त्यांची उमेदवारी सर्वांना एकमताने मान्य होण्यास कोणतीही अडचण येणार नाही.अशी चर्चा आता तालुक्यात सुरु झाली आहे.

No comments:

Post a Comment