फलटण येथे दिड हजाराची लाच स्वीकारताना तालाठ्यास पकडले - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, October 4, 2018

फलटण येथे दिड हजाराची लाच स्वीकारताना तालाठ्यास पकडले


सत्य सहयाद्री न्यूज नेटवर्क

फलटण : मौजे वडले तालुका फलटण येथील तलाठी दत्तात्रय रामचंद्र धुमाळ यांना 1 हजार 500 रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.



याबाबत अधिक माहिती अशी की, एका तक्रारदार  व्यक्तीच्या पत्नीचे विहीर पाणी हक्काचे कायम खुश खरेदी दस्तांची नोंद करून तसा ७/१२ उतारा देण्यासाठी मौजे वडले गावचे तलाठी दत्तात्रय रामचंद्र धुमाळ, वय 40, राहणार अक्षत रेसेडन्सी जाधववाडी फलटण यांनी तक्रारदार पैशाची मागणी केली होती यामुळे तक्रारदार यांने लाच लुचपत विभागाकडे दि 3 ऑक्टोबर रोजी  तक्रार दाखल केली होती. दि 3 रोजी लाच लुचपत विभागाचे केलेल्या पडताळणी करण्यात आली. यावेळी तक्रारदार यांना 2 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडी अंती 1 हजार 500 रुपयांची रक्कम ठरली.  त्यानुसार आज दि 4 रोजी दुपारी गजानन चौक येथील व्होडाफोन मिनी स्टोअरच्या इमारती समोर सापळा कारवाईवेळी 1 हजार 500 हजाराची लाच स्वीकारताना दत्तात्रय रामचंद्र धुमाळ यांना रांगेहाथ पकडण्यात आले. त्याच्या विरोधात फलटण शहर पोलिस स्टेशनला भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती.



सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सातारा पोलिस उपाधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरीफा मुल्ला व पो.हा भरत शिंदे, पो.ना अजित कर्णे, विनोद राजे,पो.कॉ विशाल खरात यांनी केली आहे. लाच मागणी संदर्भात तक्रारी असल्यास पोलिस उपअधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंध विभाग, सदर बझार, सातारा येथे अथवा कार्यालय दूरध्वनी क्रमांक 02162/238139 तसेच 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment