सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क
औंध :- क्रांतिसूर्य महात्मा फुले प्रतिष्ठानचे वतीने घेण्यात आलेल्या पर्यावरण पुरक गणेशोत्सव स्पर्धेत कोल्हाटी युवा शक्ती गणेश मंडळाने प्रथम क्रमांक मिळविला.
मंडळाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गाधीं यांच्या जयंतीचे औच्चीत्य साधून प्रतिष्टाणच्या वतीने घेण्यात आलेल्या पर्यावरण पुरक गणेश उत्सव स्पर्धेचा बक्षीसांचे वितरण करण्यात आले. या स्पर्धेत कोल्हाटी युवा शक्ती गणेश मंडळ (प्रथम), ज्योतिर्लिंग गणेश मंडळ (द्वितीय), बालगणेश तरुण मंडळ (तृतीय), मोरया गणेश तरुण मंडळ (चतुर्थ) क्रमांक पटकावला.विजेत्या मंडळाना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले.
यावेळी सरपंच सौ नंदीनी इगंळे राज वैभव प्रतिष्टाणचे अध्यक्ष दत्ताभाऊ जगदाळे अरुण रणदिवे, बापूसाहेब कुभांर, निळूभाऊ काबंळे, विशाल राऊत, संदीप गुरव, बाळकृष्ण कुभांर, सदाशिव इगंळे, सी व्ही कुभांर, उमेश जगदाळे यांची प्रमुख उपस्थीत होती जे व्ही खराडे सर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीचे विचार पटवून देऊन युवकानां मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला कोल्हाटी युवा शक्ती गणेश मंडळ जोतीर्लीगं गणेश मंडळ बाल गणेश गणेश मडंळ मोरया गणेश मंडळ आष्टविनायक गणेश मंडळाचे कार्य करते व ग्राममस्थ उपस्थित होते सुत्रसचंलन तानाजी इगंळे यांनी केले प्रास्ताविक अरून रणदिवे यानीं केले आभार भरत यादव मानले
No comments:
Post a Comment