जरंडेश्‍वर शुगर मिलच्या दुषित पाण्यामुळे कुमठेंसह इतर गावांच्या आरोग्याच्या प्रश्न गंभीर - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, October 7, 2018

जरंडेश्‍वर शुगर मिलच्या दुषित पाण्यामुळे कुमठेंसह इतर गावांच्या आरोग्याच्या प्रश्न गंभीर



कोरेगाव : येथील चिमणगाव हद्दीतील जरंडेश्‍वर शुगर मिल या खाजगी साखर कारखान्याचे मळीमिश्रित दूषित पाणी तीळगंगा ओढ्यात सोडल्याने कुमठे, आसरे, कोरेगाव शहर, शिरढोणहून कठापूर येथे कृष्णानदीपर्यंत मिसळल्याने या ओढ्यावरील बंधारे दूषित झाले आहेत.
या ओढ्याच्या मार्गात येणार्‍या खाजगी, गावोगावचा पाणीपुरवठयाच्या विहिरी दूषित झाल्या आहेत. मळीमिश्रित दूषित पाण्यामुळे तीळगंगा ओढा, वसना वांगना नदी आणि आता कृष्णा नदीत पाणी मिसळल्यामुळे काठावरील गावांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जरंडेश्‍वर साखर कारखान्याच्या गलथान व्यवस्थापनाविरोधात कुमठे, आसरे परिसरात संताप व्यक्त होत आहे. जरंडेश्‍वर साखर कारखान्याचे खरे मालक माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखान्याच्या मळीमिश्रित दूषित पाणीप्रश्‍नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी गावोगावच्या ग्रामस्थांकडून होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गुरू कमोडीटीज प्रा. लि. या खाजगी कंपनीच्या माध्यमातून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांनी जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखाना राज्य सहकारी बँकेकडून लिलाव प्रक्रियेद्वारे 65 कोटी 75 लाख रूपयांना 2009 साली घेतला. तेव्हापासून आजअखेर या कारखान्याचे गाळप सुरू आहे. गेल्या 10 वर्षात कारखान्याचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी आ. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली 175 कोटी रूपये खर्च केल्याची चर्चा आहे. कारखान्याचे आधुनिकीकरण करताना मळीमिश्रित पाण्याची विल्हेवाट कशी लावायची. याचे नियोजन व्यवस्थापनाने केले नाही. त्यामुळे गेले अनेक वर्ष जरंडेश्‍वर कारखान्याचे दूषित पाणी तीळगंगा ओढ्यात सोडले जात आहे. या मळीमिश्रित दूषित पाण्यामुळे या ओढयाच्या काठावरील कुमठे, आसरे गावच्या हद्दीतील बंधारे दूषित झाले आहे. गेले दोन दिवस सलग कारखान्याचे मळीमिश्रित पाणी ओढ्यात सोडल्याने कुमठे, कोरेगाव, शिरढोण, आसरे परिसरातून वाहणारा हा ओढा दूषित झाला आहे. या ओढ्यावरील सर्व बंधारे या मळीमिश्रित पाण्यामुळे दूषित झाले आहेत. या पाण्याला दुर्गंधी येत आहे. हे पाणी कुमठे, आसरे, कोरेगावमार्गे वसना नदीतून पुन्हा येथील कृष्णा नदीत मिसळले आहे. या दूषित पाण्यामुळे कुमठे, आसरे, कोरेगावच्या सार्वजनिक नळपाणी पुरवठ्याच्या विहिरी दूषित झाल्या आहेत. त्यामुळे संबंधित गावच्या ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.  यामुळे कारखाना व्यवस्थापनाविरोधात कुमठे, आसरे,  शिरढोण परिसरातील त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ग्रामस्थांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
हे मळीमिश्रित पाणी अजून एक महिना ओढ्यात सोडले जाणार आहे. या दरम्यान साखर कारखान्यावर खत निर्मितीचा मोठा उद्योग उभारून पुढील तीस दिवसानंतर साखर कारखान्याचे मळीमिश्रित पाणी खत निर्मितीच्या उद्योगासाठी वापरले जाणार आहे. याबाबत शासनाच्या प्रदूषण मंडळाने वेळोवेळी लेखी समज दिली. कायदेशीर कारवाईचा इशारा वेळोवेळी दिला. तरीही कारखान्याच्या मुजोर व्यवस्थापनाने हे मळीमिश्रित दूषित पाणी तीळगंगा ओढयात सोडणे अद्याप सुरूच आहे. त्यामुळे  परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

No comments:

Post a Comment