मातीतील खेळ व खेळाडू जाेपासण्याचे काम श्वासाच्या अंतिम क्षणापर्यंत करणार : रणजितसिंह देशमुख - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, October 7, 2018

मातीतील खेळ व खेळाडू जाेपासण्याचे काम श्वासाच्या अंतिम क्षणापर्यंत करणार : रणजितसिंह देशमुख



 सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
औंध  : खटाव माणच्या मातीतील खेळ व खेळाडू जाेपासण्याचे काम श्वासाच्या अंतिम क्षणापर्यंत करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा नियाेजन समितीचे सदस्य रणजितसिंह देशमुख यांनी केले. येथील फिनिक्स आॅर्गनायझेशन सभागृहात विभागीय स्तरावर निवड झालेले कुस्ती ‌क्षेत्रातील साेहम महेश गुरव व मैदानी स्पर्धेतील प्रगती सुरेश जाधव यांच्या सत्कार प्रसंगी ते बाेलत हाेते.यावेळी उपनगराध्यक्ष विपुल गाेडसे, नियाेजन सभापती सुनिल गाेडसे, नगरसेवक शहाजीराजे गाेडसे , डाॅ.महेश गुरव , डाॅ.संताेष गाेडसे , परेश जाधव, पृथ्वीराज गाेडसे आदिंची प्रमुख उपस्थिती हाेती.रणजितसिंह देशमुख म्हणाले,खटाव- माण या तालुक्यातील पाणी प्रश्न, राेजगार व आैद्याेगिक प्रकल्प हे जटील प्रश्न साेडविण्यात आपणास थाेडे-फार यश मिळाले असून या भूमीतील भावी पिढीला दिशा व न्याय देण्यासाठी या भागातील मातीची परंपरा टिकविणे काळाची गरज अाहे.ते पुढे म्हणाले की, गत तीस वर्षापासून या विभागात काम करताना दुष्काळी कलंक पुसण्यासाठी आपण अहाेरात्र प्रयत्न केले. या कामी पक्षीय मतभेद व राजकीय गट-तट न पाहता ज्यांनी सुरुवातीपासून साथ दिली. त्यांच्यामुळेच हा दुष्काळी कलंक हटविण्याचे शिवधनुष्य  पेलण्याचे सामर्थ्य आपणास मिळाले. ते पुढे म्हणाले , ग्रामीण भागातील खेळाडुंना अनेक संकटांना सामाेरे जावे लागते.याची प्रचिती वारंवार दिसून येत असल्याने या पुढील काळात खटाव- माण तालुक्यातील क्रिडा शिक्षकांनी हाेतकरु खेळाडुंच्या बाबतीत निसंकाेचपणे संपर्क साधण्याचे आव्हान केले. प्रास्ताविकात क्रिडा शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार म्हणाले , पिंगळी ता.माण येथे छ.शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात भारतीय व पाकिस्थानी कुस्ती मल्लांची लढत भरवून रणजितभैय्यांनी खेळाडूंच्या मनात एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. तेव्हापासूनचं या दाेन्ही तालुक्यातील मैदानी खेळांना व खेळाडूंना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले. आजपर्यत अनेक दुर्लक्षित खेळाडूंना त्यांचे काैशल्य पाहून राज्यपातळीवर जाणेसाठी सर्वताेपरी मदतही केली. भैय्यांच्या या मदतीची प्रेरणा घेवून या पुढील काळात हेच खेळाडू या भागाचा नावलौकिक वाढवतील यात तीळमात्रही शंका नाही. याप्रसंगी उपनगराध्यक्ष विपुल गाेडसे , नगरसेवक डाॅ.महेश गुरव आदिंनी आपले मनाेगत व्यक्त केले. याप्रसंगी  क्रिडाशिक्षक राजेंद्र जगदाळे, अपुर्वा अॅकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष अमाेल बाेटे, डाॅ.नितीन जगदाळे,निलेश घार्गे, अनंत शिखरे , अमित देशमुख आदिसह क्रिडाशिक्षक व खेळाडू उपस्थित हाेते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन के.टी.घाडगे यांनी केले तर आभार संजय गांधी निराधर याेजनेचे तालुकाध्यक्ष विजय शिंदे यांनी मानले.

No comments:

Post a Comment