सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
औंध : चौकीचा आंबा ते रहिमतपूर रस्त्यावर कासव माहंडुळाच्या तस्करी विक्री प्रकरणी पाच जणांना अटक करून सुमारे पावणेसात लाखाचा ऐवज औंध पोलीसांनी जप्त केला औंध पोलिसांनी केलेल्या धडक कारवाई मुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत औंध पोलीस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी, शनिवारी सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास सूरज अशोक जाधव रा.खालची अंभेरी ता.कोरेगाव हा आपल्या साथीदारांसह चौकीचा आंबा ते रहिमतपूर रस्त्यावर अंभेरीनजीक कासव महांडुळाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती औंध पोलीसांना मिळाली. त्यानुसार चौकीचा आंबा परिसरात पेट्रोलिंगवर असणार्या औंध पोलीसांच्या पथकाने अंभेरीनजीक रस्त्याच्या कडेला छापा मारला असता त्याठिकाणी एक बलेनो कार ,एक निळया रंगाचे प्लास्टिक बँलर तसेच काही जण आढळून आले. त्यामध्ये सुनील लोखंडे वय 34रा.संगमनगर सातारा, रोहन राऊत वय 21 रा.बिदाल,शिवलिंग दुबळे वय 26रा.दहिवडी, सागर मदने वय 23रा.कोकराळे ,प्रसाद जाधव वय 22 रा.खोकडवाडी हे पोलीसांच्या तावडीत सापडले .त्यांनी आपण सर्वजण कासव व माहंडुळाची विक्री करण्यासाठी आलो असल्याचे पोलीसांना सांगितले. यावेळी बँरलमधील कासव पोलीसांनी जप्त करून वरील पाच संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली. तसेच एक लाख रुपये किंमतीच्या कासवासह रोख सोळा हजार पाचशे रूपये, बावन्न हजार रुपये किंमतीचे सहा मोबाईल सेट ,पाच लाख रुपये किंमतीची बोलेनो कार असा एकूण सहा लाख अडुसष्ट हजार पाचशे रुपये किंमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
त्यानंतर रविवारी सकाळी कासवाची वैद्यकीय तपासणी करून ते वनविभागाचे अधिकारी वडूजचे वनक्षेत्रपाल जे.आर.चव्हाण, वनरक्षक आर.एस.काशीद, बी.एस.जावीर यांच्या ताब्यात देण्यात आले.
याबाबतची फिर्याद प्रशांत पाटील यांनी औंध पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.
पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल वडनेरे ,सपोनि सुनील जाधव,पोलीस हवालदार सुभाष काळेल, प्रशांत पाटील,नितीन सजगणे,
कुंडलिक कटरे,सागर पोळ यांच्या पथकाने हि कारवाई केली व वन्य जीव अधिनियम कायद्यान्वये पोलीसांनी फरार आरोपीसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला.
मुख्य संशयित फरारी
कासव महांडुळ तस्करी विक्री प्रकरणातील मुख्य संशयित सूरज अशोक जाधव रा.खालची अंभेरी ता.कोरेगाव हा पोलीसांची चाहुल लागताच बँगेत ठेवलेल्या महांडुळांसह छापा मारलेल्या ठिकाणावरून डोंगरातून पळून गेला आहे. त्यामध्ये दोन ते तीन महांडुळ असल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे तसे धागेदोरे पोलीसांच्या हाती लागले असून पोलीस संशयित आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
No comments:
Post a Comment