औंंध येथे आज अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ पालखीचे आगमन; मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, November 13, 2018

औंंध येथे आज अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ पालखीचे आगमन; मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क 

औंध : अक्कलकोट जि.सोलापूर येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या पालखीचे बुधवार दि.14 रोजी औंध येथे आगमन होणार असून यानिमित्त औंंध येथील श्री स्वामी समर्थ सेवाश्रमामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत अशी माहिती सेवाश्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय शिंदे व विश्वस्त मोहन शिंदे यांनी दिली.


वडूज, पळशी मार्गे ही पालखी औंध येथील केदार चौक येथे सायंकाळी चार वाजता येणार आहे. त्यानंतर औंध गावातील विविध मान्यवर ,पंचक्रोशीतील भाविक यांच्यावतीने  पालखीचे स्वागत केले जाणार आहे. यावेळी पालखी मार्ग स्वच्छ करून सडारांगोळया काढल्या जाणार आहेत.  औंध गावातून पालखीची मिरवणूक काढली जाणार आहे. श्री स्वामी समर्थ सेवाश्रमामध्ये पालखी मुक्कामास थांबणार आहे. यावेळी तेथील मंदिरात आरती, महाप्रसाद वाटप केले जाणार आहे. रात्री भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.


गुरुवारी सकाळी पालखीतील पादुका, प्रतिमेस अभिषेक घातला जाणार आहे. त्यानंतर आरती व अन्य धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर पालखीसोबत आलेल्या सेवेकरी मंडळींचा यथोचित गौरव केला जाणार आहे. त्यानंतर पालखीला निरोप दिला जाणार आहे. ही पालखी पुसेसावळी, मसूर मार्गे कोकणाकडे प्रस्थान करणार आहे तरी सर्व भाविक, ग्रामस्थांनी यासोहळयास उपस्थित रहाण्याणे आवाहन औंध येथील श्री स्वामी समर्थ सेवाश्रमाच्यावतीने करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment