मलकापूरातील बोगस मतदारांसंदर्भात न्यायालयात जाणार :- दादासाहेब शिंगण - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, November 23, 2018

मलकापूरातील बोगस मतदारांसंदर्भात न्यायालयात जाणार :- दादासाहेब शिंगण


सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क 
मलकापूर: मलकापूरातील बोगस मतदारांसंदर्भात न्यायालयात जाणार असल्याचे मनसेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब शिंगण यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
  कराड तालुक्यातील बहुचर्चित मलकापूर नगरपरिषदेची निवडणूक येत्या काही दिवसात लागणार असुन आरोप प्रत्यारोपासह शहरात वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.
येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब शिंगण यांनी शहरातील बोगस मतदारांवर आक्षेप घेत वेळ प्रसंगी न्यायालयात दाद मागण्याची तयारी केलेली आहे.त्यामुळे राजकिय वर्तूळात खळबळ माजली आहे. जिल्हाधिकारी ना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि 
          मलकापूर नगरपरिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन ३१ आॅक्टोबर २०१८ अखेर पर्यंत  शहरातील १६० ते १७७ या यादीभागामध्ये नव्याने नोंदणी केलेल्या मतदारांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपल्या राजकिय फायद्यासाठी परराज्यातील , परजिल्ह्यातील ,तसेच कराड तालुक्यातील गावांमधील मतदारांची नोंदणी जाणीवपूर्वक मलकापूरच्या यादीभागामध्ये केल्याचे आढळून येत आहे.
        त्याचबरोबर फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन असे गंभीर प्रकार शहरामध्ये घडले आहेत. लोकशाहीच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक असुन या गोष्टींचा गांभिर्यपूर्वक विचार व्हावा तसेच मलकापूर नगरपरिषद निवडणूकीमध्ये शहरातील इतर यादी भागातील मतदार सोयीनुसार आपआपल्या यादीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न काही राजकिय मंडळी करतील.त्यामुळे प्रभाग यादी बनवताना शहरातील संबधित मतदार नोंदणी अधिकारी यांना तसेच बी.एल.ओ.यांना योग्य त्या सुचना देऊन याद्या बनवाव्यात तसेच जे मतदार या शहरामध्ये वास्तव्यास नसतील त्यांची नावे सुधारित याद्यांमधून कमी करुन याद्या शुध्दीकरण व्हाव्यात. या विषयांवर गांभिर्यपूर्वक विचार करुन योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन उभे करुन यासाठी वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. 
याानिवेदनाच्या प्रति प्रांताधिकारी ,तहसिलदार,मंडलअधिकारी ,मुख्याधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment