सोळशी येथे पाण्याच्या खडयात पडुन दोन बालाकांचा मुत्यु - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, November 27, 2018

सोळशी येथे पाण्याच्या खडयात पडुन दोन बालाकांचा मुत्यु


सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क

पिंपोडे बु ॥ :-  सोळशी ,ता कोरेगांव येथील बाधकामासाठी पाणीसाठवणुक करणाऱ्या खडयात चि मंथन म्हसे व चि सोहन म्हसे या दोन संख्ये भाऊ पडल्याने त्यांचा जागीच मुत्यू झाला.


याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, सोळशी येथे इद्रसेन गुलाबराव सोळस्कर रा सोळशी,ता कोरेगांव यांच्या फार्म हाऊसवर ज्योती म्हसे या कामगार आहेत. त्यांना मंथन मारूती म्हसे वय 4 व सोहम मारूती म्हसे वय 2 अशी दोन मुले आहेत या दोघाची आई ज्योती या नेहमीप्रमाने सकाळी 10 वा घरातील कामें करित होत्या तर त्यांची दोन्ही मुले हे बाहेर खेळत होती खेळता खेळता दोन्ही मुले हि शेजारी असलेल्या बाधकामासाठी पाणीसाठा करण्यासाठी खोदलेल्या खडयात पडली. काही वेळाने हि गोष्ट मुलाच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलाची शोधाशोध केली मात्र मुले कोठेच दिसली नाहीत थोड्यावेळाने मुले खडयातील पाण्यात तरगंत असताना दिसली त्यावेळी त्यांच्या आईने त्यांना बाहेर काढले त्यावेळीस त्यांचा मुत्यू झाला होता याबाबतची फिर्याद सोळशीचे पोलीस पाटील यांनी वाठार पोलीस स्टेशनला दिली असुन पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक पाटील करीत आहेत.

No comments:

Post a Comment