फलटण येथे निर्भया पथकातर्फे मार्गदर्शन शिबीर व महारॅलीचे आयोजन - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, November 30, 2018

फलटण येथे निर्भया पथकातर्फे मार्गदर्शन शिबीर व महारॅलीचे आयोजन

सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क 

फलटण :- दिनांक 29 11 2018 रोजी फलटण विभागाचे निर्भया पथकाने मा पोलीस उपअधीक्षक डॉ. अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतराव चव्हाण हायस्कूल व वेणूताई हायस्कूल येथील विद्यार्थी व विद्यार्थीना निर्भया पथकाच्या मा. पोलीस उपनिरीक्षक काळे यांनी मुलींना मार्गदर्शन करताना मुलींना व मुलांना सायबर गुन्हे कशाप्रकारे घडतात मोबाईलवर व्हाट्सअप फेसबुक वापरताना कोणती काळजी घ्यायची याबाबत माहिती दिली तसेच निर्भया पथक महिलांच्या बाबतीत घेत असलेली सुरक्षितता याबाबत माहिती दिली तसेच महिलांसाठी टोल फ्री क्रमांक 100 व 1091 क्रमांकाची माहिती दिली तसेच कॉलेज परिसरात तक्रार पेटी ठेवणेबाबत मुख्याध्यापकाना  सूचना देण्यात आल्या.

दिनांक 30 11 2018 रोजी सकाळी नऊ वाजता फलटण विभाग निर्भया पथकातील पोलीस उपनिरीक्षक काळे व पथक यांनी मा पोलीस उपअधीक्षक डॉ अभिजीत पाटील तसेच मा मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींना होणाऱ्या छेडछाडी तसेच महिलांच्या वर होणाऱ्या गुन्ह्यावर आळा घालण्यासाठी महारॅलीचे आयोजन केले होते सदर रॅलीमध्ये यशवंतराव चव्हाण हायस्कूल, वेणूताई हायस्कूल व मुधोजी हायस्कूल व कॉलेजची 2 हजार ते 3 हजार विद्यार्थिनी व शिक्षक हजर होते रॅलीची सुरुवात यशवंतराव चव्हाण हायस्कूल च्या प्रांगणात झाली तेथे डॉ अभिजित पाटील यांनी मार्गदर्शन पर भाषण करून यशवंतराव चव्हाण हायस्कूल येथून एसटी स्टँड - नाना पाटील चौक - शिवाजी चौक - डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक व गजानन चौक मार्गे रॅली काढून रॅलीची सांगता माळजाई मंदिराच्या प्रांगणात विद्यार्थीना खाऊ वाटपाचा कार्यक्रम करून करण्यात आली.

1 comment: