कोरेगाव आगाराने मनमानी कारभार न थांबविल्यास औंध ग्रामस्थ रास्ता रोको करणार, बंद केलेल्या एसटी गाड्या त्वरित सुरू करण्याची मागणी - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, November 28, 2018

कोरेगाव आगाराने मनमानी कारभार न थांबविल्यास औंध ग्रामस्थ रास्ता रोको करणार, बंद केलेल्या एसटी गाड्या त्वरित सुरू करण्याची मागणी



औंध :मागील वीस ते पंचवीस वर्षापासून सुरू असलेली सातारा ते कान्हरवाडी ही एसटी गाडी तीन
दिवसांपासून औंधमार्गे अचानक बंद केल्याने विद्यार्थी, प्रवासी, चाकरमान्यांची मोठी गैरसोय  होऊ लागली आहे.  कोरेगाव आगाराच्या मनमानी कारभाराबद्दल औंधसह परिसरातील  गावातील ग्रामस्थ,प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ही फेरी पुर्ववत न सुरू केल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
 कोरेगाव आगाराने गेल्या वर्षी उत्पन्नाचे कारण पुढे करून सातारा सांगली ही औंधमार्गे जाणारी एस बंद केली. त्यापाठोपाठ आता कान्हरवाडी सातारा ही कोरेगाव आगाराची औंधमार्गे पुसेसावळी चोराडे, म्हासुर्णे मायणी वरून कान्हरवाडीला जाणारी बसफेरीचा मार्ग अचानक बदलून औंध परीसरातील प्रवाशी आणि शालेय विद्यार्थ्यांना आणखी एक दणका दिला आहे. ही बस आता रहिमतपूर, आर्वी ,नागझरी मार्गे  सुरू करण्यात आली असून औंधमार्गे जाणारी ही एसटी गाडी नेमकी कोणाच्या सोयीसाठी  त्यामार्गे सुरू करण्यात आली आहे. असा खुलासा कोरेगाव आगारप्रमुखांनी करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या गाडीचा मार्ग अचानक बदलल्याने म्हासुर्णे, चोरांचे, शेनवडी, वांझोटी, वडगांव पुसेसावळी, कळंबी वडी त्रिमली येथील विद्यार्थी औंधला ज्युनिअर कॉलेज सिनियर कॉलेजला तसेच आय टी आय मध्ये शिक्षणासाठी येतात त्यांचे मोठे शालेय नुकसान झाले आहे. त्यामुळे जाणीव पूर्वक विद्यार्थी आणि प्रवाशांना त्रास देण्याच्या हेतूने कोरेगाव आगाराने या गाडीचा माग्र् बदलला आहे.त्यामुळे ही एसटी औंधमार्गे पूर्ववत सुरू करावी. येत्या दोन दिवसात ही एसटी पूर्ववत सुरू नकेल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा औंध व परीसरातील  ग्रामस्थ, युवक ,विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी दिला आहे.
      जिल्हा नियंत्रक लक्ष देतील काय.
 कोरेगाव आगाराचा भोंगळ कारभारामुळे प्रवाशी आणि शालेय विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एक अधिकार्‍याच्या सोईसाठी एस टी चा मार्ग बदलण्याचा घाट कोरेगाव आगाराने घातला आहे. परंतु लोकभावना लक्षात घ्या अन्यथा लोकांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल अशी चर्चा ग्रामस्थांच्या मध्ये आहे.
      गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही बसफेरी औंधमार्गे पर्ववत सुरू करावी अशी आम्ही लोकशाही मार्गाने मागणी केली आहे. परंतु ती पुर्ण न झाल्यास एकही एस टी औंधमधून जाऊन देणार नाही.
सौ नंदिनी इंगळे.
सरपंच ग्रामपंचायत औंध.

No comments:

Post a Comment