सर्च सोशल सोसायटीकडून वंचितांना मदत - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, December 2, 2018

सर्च सोशल सोसायटीकडून वंचितांना मदत


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या सर्च सोशल सोसायटीकडून समाजातील वंचित घटकांना भोजन, कपडे या स्वरुपात मदत करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा स्वप्नजा भांदुर्गे यांनी दिली.
संस्थेकडून ×आशाग्राम येथील मुलांना नवीन कपडे, एहसास मतिमंद मुलांच्या शाळेत भोजन तसेच मातोश्री वृद्धाश्रमातील महिलांना साडीवाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सागर कस्तुरे, ज्येष्ठ उद्योजक किरण लखापते, एनजीओ सल्लागार मार्गदर्शन केंद्राचे रमेशचंद्र भांदुर्गे, प्रमोद मोरे, पुष्पराज वनारसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
गेल्यावर्षी संस्थेची स्थापना करण्यात आली असून संस्थेतर्फे क्षेत्रमाहुली येथे लहान मुलांसाठी स्कूल चालविण्यात येेते तेसच महिलांसाठीचे हेल्थ प्रोग्रॅम व किशोरवयीन मुलींसाठी जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात येते. नुकतीत 26/11 हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांना श्रद्धांजली वाहण्यात आली असून सामाजिक कार्यातून वंचितांना बळ देण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे स्वप्नजा भांदुर्गे यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment