औंध येथे मंगळवारपासून 44 व्या खटाव तालुकास्तरिय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, December 8, 2018

औंध येथे मंगळवारपासून 44 व्या खटाव तालुकास्तरिय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन




औंध(वार्ताहर):-
औंध येथे श्री.श्री.विद्यालय व राजा भगवंतराव ज्यू.काँलेज यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचे 44वे खटाव तालुकास्तरिय विज्ञान प्रदर्शन औंध येथे मंगळवार दि.11ते गुरुवार दि.13अखेर भरविण्यात येणार आहे अशी माहिती संयोजक गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे व  प्राचार्य एस.बी.कुंभार यांनी दिली.

मंगळवार दि.अकरा रोजी दुपारी दोन वाजता विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन औंध शिक्षण मंडळाच्या चेअरमन गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते केले जाणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती कल्पनाताई मोरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाव्हुणे म्हणून आ.जयकुमार गोरे, आ.शशिकांत शिंदे, आ.बाळासाहेब पाटील,जि .प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे ,उपसभापती संतोष साळुंखे , गटविकास अधिकारी रमेश काळे, पदाधिकारी, शिक्षण विभागातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बुधवार दि.बारा हा विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य दिवस आहे. या दिवशी दिवसभर प्रदर्शन पाहण्यासाठी खुले ठेवले जाणार आहे. यामध्ये उपकरण मांडणीबरोबर निबंध ,वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा व विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
गुरुवारी सकाळी प्रदर्शन पाहण्यासाठी खुले ठेवले जाणार आहे तसेच गुरुवारी  दुपारी दोन वाजता ः
विज्ञान प्रदर्शनाचा समारोप केला जाणार आहे. यावेळी स्पर्धतील विजेत्यांना पारितोषिक वितण केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाव्हुणे म्हणून 
समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड
डायट प्राचार्य डॉ. रामचंद्र कोरडे,माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, माजी सभापती संदिप मांडवे,राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस हणमंत शिंदे व विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी खटाव तालुक्यातील शाळांनी या विज्ञान प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन विज्ञान पर्यवेक्षिका एम.बी.मोरे यांनी  केले आहे.

No comments:

Post a Comment