पेठशिवापूरचे सरपंच, उपसरपंच राष्ट्रवादीच्या वाटेवर शिवसेनेसह देसाई गटासाठी धोक्याची घंटा - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, December 8, 2018

पेठशिवापूरचे सरपंच, उपसरपंच राष्ट्रवादीच्या वाटेवर शिवसेनेसह देसाई गटासाठी धोक्याची घंटा


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
पाटण:  पाटण तालुक्यातील  मोरणा विभाग हा शिवसेना देसाई गटाचा बालेकिल्ला समजला जातो,पाटणकर-देसाईंच्या राजकीय सत्ता संघर्षात या भागातील जनतेने सुरवातीपासूनच देसाई गटाला साथ दिली आहे, आणि या बालेकिल्ल्याचे मुख्य केंद्र स्थान म्हणून पेठशिवापूर ओळखले जाते, 
 विभागातील मुख्य बाजारपेठ असलेली पेठशिवापूर ग्रामपंचायत ही स्थापनेपासून शिवसेना देसाई गटाच्या ताब्यात आहे.परंतु दोन चार महिन्यात शिवसेना देसाई गटाचे सरपंच असलेले इरफान चाफेरकर व उपसरपंच असलेले  उस्मान शेख हे काही कारणास्तव  स्थानिक नेतृत्वावर नाराज असल्याचा सूतोवाच गेले अनेक महिन्यापासून न कळत दिसून येत आहे, त्यामुळे  देसाई गटाशी दुरावा निर्माण झालेला दिसून येत आहे.शिवसेना देसाई गटाच्या मोरणा विभागातील मातब्बर नेत्यांकडून पेठशिवापूरच्या सरपंच उपसरपंच यांची मनधरणी सुरू आहे, मात्र ते त्याच्यात अजूनतरी यशस्वी झालेले नाहीत, पेठशिवापूरच्या सरपंच,उपसरपंच यांनी जर शिवसेना देसाई गटाशी फारकत घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला तर मात्र देसाई गटाचा मोरणा बालेकिल्ला धोक्यात येईल अशी चर्चा सुरु आहे .
     आ.शंभुराज देसाई यांचे पाटण तालुक्यासह मोरणा विभागातील वाढते प्राबल्य आणि रोखठोक असणारा दरारा डावलून एवढ्या वर्ष देसाई गटाचे निष्ठावंत असणारे हे दोन तरुण कार्यकर्ते कोणत्या कारणावरून नाराज होऊन जर राष्ट्रवादीत प्रवेश करत असतील तर त्यांचे एवढ्या वर्षाचे तप वाया जात आहे असेच म्हणावे लागेल .खऱ्या अर्थाने शिवसेना देसाई गटाबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य बशीर खोंदु यांचे ते खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे, मात्र  माजी जिल्हा परिषद सदस्य बशीर खोंदु यांच्यातील मतभेदांमुळे  खंदे समर्थकांमधे नाराजी निर्माण झाली आहे की काय ?आणि याच नाराजी मुळे पेठशिवापूरचे  सरपंच,उपसरपंच शिवसेना देसाई गटातून फारकत घेत आहेत अशी मोरणा विभागातील राजकीय वर्तुळात चर्चा ऐकायला मिळत आहे.      
     दरम्यान आगामी 2019 च्या निवडणुकीसाठी  हा ऐतिहासिक होणारा बदल राष्ट्रवादी साठी पोषक तर देसाई गटासाठी धोकादायक ठरणार आहे यामध्ये कोणतीही शंका नसल्याचे बोलले जात आहे. 

No comments:

Post a Comment