विजय दिवस समारोह निमित्त सैन्य दलातील चित्तथरारक कसरतींसह शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन ठरणार कऱ्हाडकरांसाठी पर्वणी - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, December 11, 2018

विजय दिवस समारोह निमित्त सैन्य दलातील चित्तथरारक कसरतींसह शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन ठरणार कऱ्हाडकरांसाठी पर्वणी


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
कऱ्हाड:भारताने बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यात पाक सैन्यावर मिळविलेल्या विजयाच्या प्रित्यर्थ  गेली २० वर्षे कऱ्हाड येथे १४,डिसेंबर ते १६डिसेंबर ला विजयदिवस समारोह  साजरा केला जातो. त्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत अडव्होकेट संभाजी मोहिते यांनी समारोह मध्ये होणाऱ्या कार्यक्रम व पुरस्कारांबद्दल माहिती देताना दरवर्षी सारखेच यावर्षीचा ही  समारोह कऱ्हाडकरांसाठी पर्वणी ठरणार असल्याचे मोहिते म्हणाले.
    दरवर्षी कर्नल संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा समारोह साजरा करण्यात येतो.यंदा  या विजय दिवस समारोहचे २१वे वर्ष  आहे.

दि.१४ डिसेंबर रोजी सकाळी   नऊ वाजता शोभयात्रेने या समारोहास प्रारंभ होईल.त्यानंतर लिबर्टी मजदूर मंडळाच्या मैदानावर मान्यवरांच्या हस्ते शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.दुपारी १२वाजता सैनिक मेळावा तर सायंकाळी साडेसहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रम त्याच बरोबर मीनल ढापरे यांना यशस्वी सांस्कृतिक वाटचाली बद्दल,नव्याने सब लेफ्टनंट पदी निवड झालेले हर्षवर्धन मोहिते, खेळाडू केदार  गायकवाड, केदार साळुंखे यांचे सत्कार  व  सार्वजनिक गणेश मंडळाना गणराया अवार्ड  प्रदान करण्यात  येणार आहेत.
  दि.१५ रोजी सकाळी आठ वाजता स्वच्छता दौड  व त्यानंतर रक्तदान शिबिर चे आयोजन करण्यात आले आहे.सायंकाळी सहा वाजता  पदमभूषण ज्येष्ठ उद्योगपती बाबासाहेब कल्याणी यांना जीवन गौरव यशवंत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.तर रेखा सूर्यवंशी ,मस्करवाडी(ता.माण) यांना वीरपत्नी, छाया पाटील ,कामेरी(ता.वाळवा) यांना आदर्श माता  पुरस्कार बरोबरच राष्ट्रीय खेळाडू राही सरनोबत , निवड झालेले आदर्श विद्यार्थी यांना माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील , भारती विद्यापीठ कुलगुरू डॉ.माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असल्याचे अडव्होकेट संभाजी मोहिते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
   या पुरस्कार व मानपत्र सोहळ्यासाठी आमदार बाळासाहेब पाटील , नगराध्यक्षा सौ.रोहिणी शिंदे,मुख्याधिकारी यशवंत डांगे, अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी उपस्थित राहणार आहेत.
  दि.१६ रोजी समारोह चा मुख्य दिवशी दुपारी  दोन वाजता  छत्रपती शिवाजी स्टेडियम मध्ये सैन्य दलातील जवानांचे चित्तथरारक कसरतींसह डेअर डेव्हील्सचे पथक  आकर्षण ठरणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले.
  डोळ्याचे पारणे फिटणाऱ्या या समारोहास कराडकर नागरिकानी उपस्थित राहण्याचे आवाहन विजय दिवस समितीकडून करण्यात आले आहे.

शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शनासह  सैन्य दलातील  जवानांचे डेअर डेविल्स  पथक कऱ्हाडकरांचे आकर्षण ठरणार आहे.
पदमभूषण बाबासाहेब कल्याणी ठरले विजय दिवस समारोहच्या जीवनगौरव यशवंत पुरस्काराचे मानकरी.

No comments:

Post a Comment