सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
आनेवाडी : जावळी पंचायत समितीचा बांधकाम विभाग हा नेहमीच चर्चेत राहिला आहे.कधी पंचायत समिती सदस्यांच्या तक्रारारी तर कधी सरपंच,ग्रामस्थांच्या तक्रारिंन मुळे बांधकाम विभाग सतत वादात राहिला आहे.अलीकडच्या काही महिन्यांमध्ये तर या विभागातील शाखा अभियंत्यांकडून प्रामाणिकपणे,नियमात राहून काम करणाऱ्या ठेकेदारांनाच नाहक त्रास दिला जातोय.तर याविभागात ठेकेदारांचे शेवटचे बिल काढण्यासाठी टक्केवारी घेतल्याशिवाय बीलच दिले जात नसल्याचा तक्रारारी दबक्या आवाजात सदस्यांपर्यंत आल्या आहेत.त्यामुळे बांधकाम मधील टक्केवारी वर सदस्यांनीच अंकुश ठेवावा अशी मागणी होत आहे.
जावळी पंचायत समितीच्या मासिक सभेत अनेकदा सदस्यांनी बांधकाम विभागाच्या कामकाजावर टीका केली.एका सभेत तर सदस्यांच्या टीकेला उत्तर देताना आपण सभा झाल्यानंतर अँटीचेंबर मध्ये बसून चर्चा करू असे उत्तर उपअभियंता खैरमोडे यांनी दिल्यामुळे सभागृहातील सर्वच अवाक झाले.तर अनेकदा सदस्यांनी बांधकामाच्या तक्रारारी मांडूनही बांधकाम विभागाच्या कामकाजात कसलीही सुधारणा झालेली पाह्ययला मिळत आहे.
आता तर कहर म्हणजे बांधकाम विभागात टक्केवारी वाढल्यामुळे तालुक्यातील ठेकेदार पुरते मेटाकुटीला आले आहेत.यामध्ये छोट्या ठेकेदारांना काम करताना मोठी कसरत करावी लागत आहे.अधिकाऱ्यांच्या टक्केवारीमुळे कामाची गुणवत्ता कशी राख्यायची असा मोठा प्रश्न ठेकेदारांसमोर पडत असून वेळप्रसंगी पदरमोड करावी लागत आहे. तरी बांधकाम विभागाच्या टक्केवारीला सदस्यांनीच लगाम घालावा अशी मागणी ठेकेदारांमधून होत आहे.
सूचना करू
पंचायत समिती मासिक सभेत अनेकदा बांधकामच्या तक्रारारी मांडूनही बांधकाम अधिकाऱ्यांच्या कामकाजात सुधारणा होत नाही.काही ठेकेदारांनी सदस्यांकडे शाखा अभियत्यांच्या तक्रारारी मांडल्या आहेत.याबाबत बांधकाम अधिकाऱ्यांना सूचना केल्या जातील.
सौरभ शिंदे,
पंचायत समिती सदस्य,जावळी
No comments:
Post a Comment