चित्रकलेच्या कुंचल्यातुन पाटणची विविधता राज्याच्या कानाकोपऱ्यात गेली.- श्रीमंत विक्रमसिंह पाटणकर. - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, December 19, 2018

चित्रकलेच्या कुंचल्यातुन पाटणची विविधता राज्याच्या कानाकोपऱ्यात गेली.- श्रीमंत विक्रमसिंह पाटणकर.


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
पाटण:- राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेच्या निमीत्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातुन आलेल्या चित्रकारांनी पाटण तालुक्याच्या विविधतेचे दर्शन आपल्या रंगातुन राज्याच्या कानाकोपऱ्यात नेली. या निमीत्ताने पाटणचे नैसर्गीक सौंदर्य रंगछटांच्या शिपंल्यात खुलले. असा नाविण्यपुर्ण उपकरम किल्ले सुंदरगड ( दातेगड ) संवर्धन समितीने राबवुन चित्रकारांच्या कलेला वाव दिलाच या बरोबर येथील नैसर्गिक सौंदर्याचे पर्यटन वाढविण्याचा प्रयत्न हि केला. असे नाविण्यपुर्ण उपकरम राबविल्यास स्पर्धकांच्या स्पर्धात्मक गुणांना वाव मिळेल. असे गौरव उध्दगार राज्याचे माजी सार्व.बांधकाम व पर्यटन मंत्री श्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर यांनी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेच्या बक्षिस समारंभ प्रसंगी काढले.
            किल्ले सुंदरगड ( दातेगड ) संवर्धन समिती पाटणच्या माध्यमातुन श्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमीत्त राज्यस्तरीय चित्रकलेचा स्पर्धेचे आयोजन.करण्यात आले होते. या चित्रकला स्पर्धेच्या बक्षिस समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रसिध्द चित्रकार रुपेश परुळेकर वेंगुर्ला, सुरभी गोवलकर पुणे, प्रा. सतिश उपळावीकर प्रा. एस. डी. पवार, विलासराल क्षिरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.  
               या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमाकांचे पारितोषिक -अवधुत करजगी. सांगली  यांना मिळाले व्दितीय क्रमांक- शुभम तपकीरे. हर्णे (सिंधूदूर्ग), तिसऱ्या क्रमांकाचे- हर्षवर्धन देवताळे. सांगली, चौथा क्रमांक- रुपेश सोनार. पुणे, आणि उत्तेजणार्थ- अतुल गेंधळे. पुणे, नवनाथ चौधरी. पिंपळशेत, दयानंद देसाई. मुंबई, सलिम दरवेशी. कुसूर, संदिप कुंभार. ईचलकरंजी, वैभव जगताप. मुंबई या चित्रकलांना मिळाले. या चित्रकला स्पर्धेसाठी राज्यभरातुन सरासरी सव्वाशे चित्रकारांनी सहभाग घेतला. सर्व सहभागी चित्रकारांना किल्ले सुंदरगड संवर्धन समितीकडून सन्माणपत्र आणि कोयना पर्यटन पुस्तिका भेट देण्यात आले. 
            यावेळी सुंदरगडावर आतापर्यंत राबविलेल्या संवर्धन कार्याचे चित्रस्वरुप दर्शन व्हिडीओ स्क्रिनवर दाखविण्यात आले. याचे विवेचन प्रा. मनोहर यादव यांनी आपल्या कौशल्य पुर्ण संभाषणात मांडले. या सुंदरगड चित्रस्वरुप दर्शनाची निर्मीती संतोष लोहार यांनी केली. तर याची संकल्पना लक्ष्मण चव्हाण यांनी मांडली. यावेळी सुंदरगड संवर्धन समितीचे यशवंतराव जगताप, धैर्यशिल पाटणकर, काशीनाथ विभुते, महादेव खैरमोडे, शंकरराव कुंभार, चंद्रहार निकम, शंकर मोहिते, नितीन खैरमोडे, अनिल भोसले, निलेश फुटाणे, अनिल बोधे, अनिस चाऊस, राजेंद्र सांळुखे, अविनाश पराडकर, आनंदा मोळावडे, शशिकला हादवे यांच्यासह पाटणच्या नगराध्यक्षा सौ. सुषमा महाजन, उपनगराध्यक्ष दिपक शिंदे, नगरसेवक किरण पवार, अजय कवडे, सचिन कुंभार, बापुराव टोळे, संजय इंगवले, मंगेश पाटणकर, बाळासो पवार, विद्या नारकर, सुरेश संकपाळ, प्रविण जाधव, संजय कांबळे, आदीसह चित्रकार स्पर्धक, विद्यार्थी नागरीक यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.

No comments:

Post a Comment