एटीएम कार्डचा वापर करून स्वॅप मशिनद्वारे फसवणूक करणारी टोळी गजाआड, वाठार स्टेशन पोलिसांची कारवाई - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, December 4, 2018

एटीएम कार्डचा वापर करून स्वॅप मशिनद्वारे फसवणूक करणारी टोळी गजाआड, वाठार स्टेशन पोलिसांची कारवाई


 सदरच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी व पोलीस अधिकारी , कर्मचारी. 

सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क 

वाठार स्टेशन : -  वाठारस्टेशन पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ४/१२/२०१८ रोजी वाठार पोलीस स्टेशन हद्दीतील स्वामी पेट्रोलियम पंपावर काही अज्ञात इसमांनी त्यांचेकडील एटीएम कार्डचा वापर करून पेट्रोल पंपावरील स्वॅप मशीन मधून ६०००/ रुपये काढले व पुन्हा स्वॅप मशीन च्या सेटिंग मध्ये जाऊन झालेला व्यवहार रद्द करून स्वतःच्या खात्यावरून कपात झालेली रक्कम रुपये ६०००/ परत आपल्या खात्यावर जमा करून घेतली. सदरच्या घटनेत आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पेट्रोल पंपाचे मालक श्री सदाशिव मलिशम बेळगुंफे वय ४३, रा. वाठार स्टेशन ता कोरेगाव जि सातारा यांनी आपली फिर्याद वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात दिली असून ती गु.र.नं. २०६/२०१८ भादविक ४२०,३४ अन्वये दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तातडीने तपास करण्याकामी श्री पंकज देशमुख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. धीरज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी नमूद गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अज्ञात आरोपीचा शोध घेऊन त्यांना नमूद गुन्ह्याचा तपासकामी ताब्यात घेण्याबाबत वाठार स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मारुती खेडकर यांना सूचना दिल्या. माहिती मिळालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकारी प्रेरणा कट्टे मॅडम कोरेगाव विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मारुती खेडकर, पोलिस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने गोपनीय माहिती घेऊन सदर गुन्ह्यातील संशयित ६ आरोपींना सापळा रचून ताब्यात घेतले असून नमूद गुन्हाच्या अनुषंगाने सखोल विचारपूस करताना सदर गुन्ह्याची कबुली दिली तसेच त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे लोणंद, फलटण, बारामती, जेजुरी या परिसरात केल्याचे कबूल केले. घटनेतील नमूद संशयितांकडून वेगवेगळ्या बँकांचे एटीएम कार्ड व रुपये १,३२०००/ रोख रक्कम हस्तगत केले आहे. तसेच श्री पंकज देशमुख पोलिस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्ह्यातील पेट्रोलपंप धारक, हॉटेल धारक व जिल्ह्यातील सर्व नागरिकांना वर नमूद प्रमाणे कोणाची फसवणूक झाली असल्यास आपली तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात द्यावी. तसेच आपल्याकडील असणारे स्वॅप मशीनचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्यावी.


सदरची कार्रवाई करण्यासाठी श्री पंकज देशमुख पोलिस अधीक्षक सातारा, श्री धीरज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सातारा,प्रेरणा कट्टे मॅडम पोलीस उपविभागीय अधिकारी कोरेगांव,व श्री विजय कुंभार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांचे मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.मारुती खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. विकास जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. महेश पाटिल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. सूर्यकांत जाधव,तसेच वाठार पोलीस स्टेशनचे अतुल कुंभार ,अजय झुंजार, सचिन जगताप आणि स्थानिक गुन्हे शाखा सातारा चे कर्मचारी रवी वाघमारे संतोष जाधव निलेश काटकर गणेश कचरे या सर्व कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी वरील कारवाई मध्ये सहभाग घेतला होता.

 सदरच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीची नावे

१) विजय धोंडीराम सूर्यवंशी वय २९, रा, पंडित नगर सिडको नाशिक ता जि नाशिक

 २) योगेश नामदेव काळे वय,२७ रा, अंबड, नाशिक ता जि नाशिक

 ३) निलेश अनंत ब्राह्मण/ भिडे वय,३१ रा. पिंपराळ, गावठाण जळगाव ता जि जळगाव

 ४) अशपाक दस्तगीर शेख वय ,३० रा. सिडको नाशिक ता,जि नाशिक.

 ५) देविदास कचरू शिंदे वय २८, रा. जाधव संकुल सातपूर अंबड रोड नाशिक ता जि नाशिक

 ६) लक्ष्मीकांत केशवराव पाटील वय,५० रा. चेतना नगर राणे नगर नाशिक ता जि नाशिक

   

No comments:

Post a Comment