आनेवाडी ता (प्रसाद देशपांडे) :-जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणुकीनंतर जावळी पंचायत समिती सभापतिपद हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्यामुळे प्रथम म्हसवे गणातून निवडून आलेल्या अरुणा शिर्के यांना संधी देण्यात आली होती.तर यावेळी सव्व्वा वर्षांचा फॉर्म्युला ठरवत नंतरच्या सव्वा वर्षात सायगाव गणातून निवडून आलेल्या जयश्री गिरी यांना संधी देण्याचे ठरले होते.त्यानुसार मंगळवारी सभापती अरुणा शिर्के यांनी जिल्हापरिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडे राजीनामा दिला.त्यामुळे आता जयश्री गिरी यांचा सभापतीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
जावळी पंचायत समितीवर राष्ट्रवादी ची एकहाती सत्ता आहे.निवडणुकीदरम्यान माजी सभापती यांचा पक्षाला सत्ता मिळवून देण्यात मोलाचा वाटा होता.त्यामुळे पहिल्या टप्प्यात त्यांच्या सुविद्य पत्नी व सायगाव गणातून निवडून आलेल्या जयश्री गिरी यांना संधी मिळेल अशी अपेक्षा गणातील कार्यकर्त्यांना होती.मात्र अरुणा शिर्के यांना प्रथम संधी देत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सव्वा वर्षांचा फॉर्म्युला ठरवला. होती.त्यानुसार जून महिन्यात सव्वा वर्ष पूर्ण झाले होते मात्र शिर्के यांचा राजीनामा घेण्यात आला नव्हता.सुहास गिरी समर्थकांनी राजीनाम्यासाठी दबाव आणल्यामुळेच अखेर शिर्के यांनी मंगळवारी राजीनामा सादर केला. त्यामुळे आता सायगाव गणातून निवडून गेलेल्या जयश्री गिरी यांचा सभापती पदाचा मार्ग मोकळा झाला असून त्यांचीच या पदावर वर्णी लागणार हे निश्चित.
जावळी सभापतिपदी पती नंतर पत्नीची निवड होऊन इतिहास होणार
जावळी सभापती अरुणा शिर्के यांच्या राजीनाम्या नंतर आता यापदावर सायगाव गणातुन निवडून आलेल्या जयश्री गिरी यांचे नाव सभापती पदासाठी निश्चित मानले जात आहे.यापूर्वी त्यांचेच पती सुहास गिरी यांनी २०१४ ते २०१६ सभापती पद भूषवले होते.तर आता त्यांच्याच पत्नी जयश्री गिरी यांना सभापती पदाची संधी मिळणार असल्यामुळे तालुक्याच्या इतिहासात प्रथमच या पदावर पती नंतर पत्नी सभापती पद भूषविणार आहे.
No comments:
Post a Comment