दहिवडीत जुगार आड्यावर छापा, जुगार खेळणारे १८ जण ताब्यात - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, December 4, 2018

दहिवडीत जुगार आड्यावर छापा, जुगार खेळणारे १८ जण ताब्यात

सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क 

दहिवडी: दहिवडी (गांधीनगर) ता. माण येथे चालणाऱ्या जुगार अड्डयावर सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या १८ जणांना सदरच्या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे व त्यांच्यावर दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये, मुबंई जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ कलम ४, ५,१२अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण १३०९५ रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी दिली आहे.


यामध्ये पकडण्यात आलेले आरोपी अक्षय संजय माने, प्रभाकर श्रीरंग जाधव, अनिल रामलिंग तोडकर, विशाल रमेश जाधव, अंकुश मोहन शेळके, दत्तात्रय बाबल्या भोसले, सॅंडल बंडा काळे व इतर १० जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी वडनेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस उप निरीक्षक गणेश वाघ, पोलीस नाईक रवींद्र बनसोडे, पोलीस शिपाई कृष्णाथ लाड यांच्या पथकाने केली आहे.

No comments:

Post a Comment