जावळीच्या उपसभापतींनी जोपासली सामाजिक बांधिलकी - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, December 5, 2018

जावळीच्या उपसभापतींनी जोपासली सामाजिक बांधिलकी


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
आनेवाडी: ग्रामीण भागातील नैसर्गिक साधन सामुग्री दिवसेंदिवस कमी होत आहे. अशावेळी कळक, कडबा पेंडी वाचविण्यासाठी जावळी पंचायत समितीचे उपसभापती दत्ता गावडे यांनी आपला४४वा  वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा करुन जावळी तालुक्यातील ४४ गावांना स्टीलचा वैंकुठरथ (तीरडी )मोफत भेट दिली आहे. यामुळे जनावरांच्या चाऱ्याचीही बचत होणार आहे
दरवर्षीप्रमाणे यंदाही दत्ता गावडे यांनी सामाजिक बांधीलकी जपन्याचा प्रयत्न केला आहे असा गौरव सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषि सभापती मनोज पवार, जावळी पंचायत समितीच्या भावी सभापती सौ जयश्री ताई गिरी, अजित जगताप,पंचायत समिती सदस्य सौरव शिंदे,व जावळी तालुक्यातील जनता करीत आहे.
    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोरेगावचे आ, शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेल्या दत्ता गावडे यांनी आ शिंदे यांची राजकीय पाठराखण केली आहे. तसेच सातत्याने सामाजिक न्याय देण्याची जबाबदारी पार पाडली आहे. जावळी तालुक्यातील खेड्यापाड्यात दुःखद घटना घडली की?अंतविधी साठी कळक व जनावरांचा चारा असलेला ज्वारीचा कडबा यांच्या साहाय्याने तिरडी बनवली जाते. त्याचा अंतविधी पार पडल्यानंतर वापर केला जात नाही. याची जाणीव ठेवून स्टीलची खास वैशिष्ट्य पूर्ण 44 तिरडी बनवून त्याचे मोफत वितरण जावळीच्या भूमीत करण्यात आले आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याची बचत झाली आहे. अशी माहिती करहर परिसरातील शेतकऱ्यांनी दिली आहे. या उपक्रमाबद्दल जावळी तालुक्यातील जनतेच्या मनात उपसभापती दत्ता गावडे यांनी वेगळे स्थान निर्माण केले आहे.
 त्यांनी वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि नेहमीप्रमाणे सामाजिक उपक्रमाला प्राधान्य दिले.यापुढेही असेच उपक्रम राबविण्यात येणार आहे. राजकीय स्पर्धा करण्याची इच्छा असेल तर विरोधकांनी अशा प्रकारे स्पर्धा करावी त्याचे मनापासून आभार मानले जातील
असे  ते म्हणाले," वाढदिवस हा दरवर्षीच येत असतो,आणि दरवर्षी काहीतरी समाजासाठी करण्याची प्रेरणा देत असतो.यावर्षी मी ४४गावांना वैकुंठरथ अर्थात तीरडी देण्याचा निर्णय घेतला.पारंपारिक पध्दतीने तिरडीसाठी कळकाचा वापर होतो.अनेक गावांत कळकीचे बेटे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.त्याची ही भविष्यात लागवड करण्याचा मानस आहे. शेवटी गरीब काय श्रीमंत काय?सर्वांच्या नशिबी एक दिवस तिरडीच उपयोगी पडते असे ही त्यांनी सांगितले.
Attachments are

No comments:

Post a Comment