मायणी सिद्धनाथ यात्रेत करमणूक कार्यक्रमांना परवानगी नाकारली तोडगा न निघाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नावरून प्रशासनाचा निर्णय - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, December 6, 2018

मायणी सिद्धनाथ यात्रेत करमणूक कार्यक्रमांना परवानगी नाकारली तोडगा न निघाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नावरून प्रशासनाचा निर्णय


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
मायणी-दत्ता कोळी
श्री सिध्दनाथ देवस्जथान यात्रा मायणी ता.खटाव जि.सातारा शांततेत पार पडावी यासाठी खटाव तालुका प्रशासनाकडून गुरुवार सायंकाळी वडूज तहसीलदार यांच्या दालनात येळगावकर व गुदगे या दोन्ही गटांची पुन्हा बैठक घेण्यात आली. परंतु मायणी गावातील सुरेंद्र गुदगे गट व डॉ दिलीप येळगावकर ,सचिन गुदगे गट यांचेत कार्यक्रम शांततेत पार पाडणेबाबत एकमत झाले नाही यामुळे प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आल्याने धार्मिक कार्यक्रम वगळता कोणताही करमणूक कार्यक्रमास परवानगी नाकारण्यात येत असल्याचे सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी ,मायणी गावची श्री सिध्दनाथ देवाची यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून पर्यायातून।करब्यात येत आहेत यासाठी 
उपविभागिय पोलीस अधिकारी .अनिल वडनेरे, .तहसिलदार खटाव(वडूज) श्रीमती. जयश्री आव्हाड, .पोलीस निरीक्षक वडूज पोलीस ठाणे यशवंत शिर्क, यांचे उपस्थितीत श्री. सिध्दनाथ देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी,
मायणी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व प्रतिष्ठीत नागरीक यांची मा. तहसिलदार सो खटाव याचे दालनात मिटींग पार पडली. मिटींग दीड तासांहून अधिक
चालूनही देवस्थान यात्रेचे दोन्ही गटांकडून कोणत्याही प्रकारे सामंजस्याची भुमिका घेणेत न आल्याने व दोन्ही गट स्वतःचे भुमिकेवर ठाम राहीलेने यात्रेसाठीचे घेण्यात येणारे
मनोरंजनाचे कार्यक्रम घेणेचे ठिकाण बाजारपटांगण मायणी, जिल्हापरीषद शाळा मायणी, यातील अंतर २०० मीटरपेक्षा कमी असून तेथे कार्यक्रम झालेस दोन्ही गटांत तणावाचे वातावरण निर्माण होऊन मोठया प्रमाणावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवून गावात अशांतता निर्माण होवू नये .याकरीता तहसिलदार  यांनी श्री सिध्दनाथ देवस्थानाचे
धार्मिक कार्यक्रम वगळता इतर सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना बंदी घालणेत आलेली असून जर त्याचे उल्लंघन झाले तर योग्य ती कायदेशिर कारवाई करणेत येईल असा
निर्णय मिटींगमध्ये घेणेत आला.
विरोधकांच्या भूमिकेने शांतता भंग 
 ही यात्रा शांततेत पार पडण्याची भूमिका असून ज्या ठिकाणी करमणूक कार्यक्रमास विरोधी गटा सह आम्हीही परवानगी मागितली आहे त्याच ठिकाणी परवानगी द्यावी यात दोन्ही गटांना कठोर नियम लागू करून,वेळप्रसंगी भाषणं बाजीस बंदी करून आपापल्या कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेण्याची जबाबदारी देऊनच कार्यक्रमास परवानगी द्यावी अशी मागणी केली. गतवर्षी झालेल्या प्रशासनाच्या निर्णयाचा आम्हीही आदर राखला होता परंतू आमच्याकडे ग्रामपंचायतीची सत्ता आल्याने आमच्या आख्यार्तीत येणाऱ्या बाजार पटांगणावर सत्ताधाऱ्यांचा कार्यक्रम होऊ द्यायचा नाही ही भूमिका विरोधकांनी घेतली असल्याने विरोधकामुळे गावातील शांतता भंग पावत आहे. परंतु आमची आजही कोणासही विरोध करण्याची भूमिका नसून यात्रा एक होऊन गावातील वातावरण सुरळीत होण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत 
- सरपंच सचिन गुदगे

सरपंचांची आडमुठी भूमिका 
गतवर्षी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वाद निर्माण झाला असता प्रांताधिकारी,तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत  मिटिंग होऊन बाजार पटांगणावर कोणीही कार्यक्रम घ्यावयाचा नाही असे प्रशासनाकडून निर्णय झाला होता.गेली 35 वर्ष बाजार पटांगणावर आम्ही कार्यक्रम करीत होतो परंतु आज प्रशासनाच्या निर्णयाचा आम्ही आदर करीत आजही या निर्णयाशी आम्ही प्रामाणिक व ठाम आहोत ,परंतु डॉ येळगावकर व सरपंच सचिन गुदगे बाजार पटांगणावरच कार्यक्रम घेण्याचा अट्टाहास करत आहे.यामुळे प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला .परंतु गावातील नागरिकांना यात्रेच्या निमित्ताने जो विरूंगुळा मिळत होता तो केवळ ग्रामपंचायत सरपंच यांच्या आढमूठया भूमिकेमुळे नागरिकांना मुकावे लागत आहे.
 - दादासाहेब कचरे ,माजी संचालक ,मार्केट कमिटी खटाव 
            

2 comments:

  1. मूर्ख घमंडी सुरेंद्र
    याला गाव पेटवायच आहे

    ReplyDelete
  2. मूर्ख घमंडी सुरेंद्र
    याला गाव पेटवायच आहे

    ReplyDelete