राज्यातील १३ वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, February 8, 2019

राज्यातील १३ वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या



सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क – राज्य सरकारने गुरुवारी राज्यातील सात वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची बदली करणयाचे आदेश दिले होते. आज शुक्रवारी राज्यातील तेरा वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश राज्य सरकारने काढले. यात पुणे य़ेथील क्रीडा विभागाचे आयुक्त एस. एम. केंद्रेकर यांची नियुक्ती औरंगाबादचे विभागीय आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.  आज राज्यातील तेरा वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे खालील प्रमाणे आदेश काढण्यात आले आहेत. 


१)औरंगाबादचे विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांची पुणे विभागाचे क्रीडा आयुक्त  म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे


२)एस. एम. केंद्रेकर यांची क्रीडा आयुक्त पदावरून औरंगाबादचे विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 


३)पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप यांची महाउर्जा ( मेडा) चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


४)जी. बी. पाटील यांची  कृषि व पशुसंवर्धन विभागाचे मंत्रालय सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे


५)आपत्ती व्यवस्थापन महसूल आणि वन विभागाचे संचालक डी. बी. देसाई यांची कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 


६)आदीवासी विकास नागपूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त एच. मोडक यांची यांची बदली वाशीमचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.


७) ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार वर्ध्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


८)वर्ध्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवल यांची अमरावतीचे जिल्हाधिकारी  म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


९)सोलापूर महानगरपालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांची जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून बदली कऱण्यात आली आहे. 


१०)वाशिमचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली पशुसंवर्ध आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. 


११) सहायक जिल्हाधिकारी आणि आयटीडीपी तळोदा नंदुरबारचे प्रकल्प अधिकारी विनय गौडा यांची नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


१२)आयटीडीपी प्रकल्प घोडेगाव व सहायक जिल्हाधिकारी खेड आयुष प्रसाद यांची अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 


१३) जितेंद्र दूडी हे नंदुरबार येथील आयटीडीपी प्रकल्प तळोदा चे प्रकल्प अधिकारी व सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम करतील.

No comments:

Post a Comment