राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढण्याचे दिले संकेत (पहा व्हिडिओ) - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, February 8, 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढण्याचे दिले संकेत (पहा व्हिडिओ)



सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क  : माढा लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी, असा आग्रह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माझ्या सर्व प्रमुख सहकाऱ्यांनी धरला आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे त्यांच्या आग्रहावर मी विचार करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. 


शरद पवार यांनी 2009 मध्ये या मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्यानंतर 2014 मध्ये राष्ट्रवादीने विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली होती. येथे 2019 च्या निवडणुकीसाठी मोहिते पाटील आणि निवृत्त आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजें नाईक निंबाळकर यांची नावे चर्चेत असताना आता परत पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. आज पुण्यातील बारामती होस्टेल येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीस शरद पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील आणि अन्य नेते उपस्थित होते. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आपण माढा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहात काय? अशी विचारणा केली असता ते म्हणाले,  माझ्या सर्व प्रमुख सहकाऱ्यांनी मला निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला आहे. विजयसिंह मोहिते पाटील आणि इतरांनीही मला माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असे सुचविले आहे. माझी इच्छा नाही. पण माझ्या सर्व प्रमुख सहकाऱ्यांनी मला सांगितले आहे की, तुमचे सर्व धोरणात्मक निर्णय आम्ही ऐकतो. एवढे तुम्ही आमचे ऐका. त्यावर मी त्यांच्या म्हणण्याचा विचार करेन असे त्यांना सांगितले आहे.



No comments:

Post a Comment