पाटण येथे चोरीच्या गुन्ह्यातील संशयित ताब्यात, पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्यास दिरंगाई - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, February 16, 2019

पाटण येथे चोरीच्या गुन्ह्यातील संशयित ताब्यात, पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्यास दिरंगाई

सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क 

पाटण:- पाटण येथे नवीन बांधण्यात आलेल्या वस्तीगृहाचे इमारतीला रंगरंगोटी करण्याच्या हजारो रुपयांच्या साहित्याची चोरी शुक्रवारी रात्री झाली असल्याच्या संशयावरून पोलिस स्टेशन परिसरातीलच काही संशयित आरोपींना शनिवारी दुपारी पाटण पोलिसांनी ताब्यात घेतले असता. शनिवारी रात्री उशिरापर्यंत या चोरीच्या गुन्ह्याची नोंद पाटण पोलीस स्टेशनला झाली नव्हती. एखादा गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना आठ ते दहा तासाचा कालावधी लागत असेल तर पोलिसांच्या या कारवाई बाबतच शंका व्यक्त करण्यात येत आहे. 


पाटण पोलीस स्टेशन पासून काही अंतरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुला-मुलींचे नवीन वस्तीगृहाच्या इमारतीचे बांधकाम मोठ्या स्वरूपात करण्यात आले आहे. या इमारतीला रंगरंगोटी करण्याचे काम सुरू आहे. यातच दोन दिवसात हजारो रुपयांच्या रंगरंगोटीच्या साहित्यांची या वस्तीगृहातून चोरी झाली असल्याचे तेथील इतर काही कामगारांच्या लक्षात आले. या बाबतीत या कामगारांनी सदर चोरीची बाब वस्तीगृहाच्या ठेकेदाराच्या निर्दशनास आणून दिली असता  याबाबतीत शनिवारी सकाळीच पाटण पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आली. संशयितांना शनिवारी दुपारीच पाटण पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र रात्री उशिरापर्यंत याबाबतीत पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद झाला नाही. एखादा गंभीर गुन्हा दाखल करण्यास ८ ते १० तास लागत असतील तर पाटण पोलिसांच्या या कार्यपद्धतीवरच संशय व्यक्त करण्यात येत आहे. पत्रकारांनी रात्री उशिरापर्यंत या चोरीच्या गुन्ह्याबाबत पाटण पोलिसांना विचारणा केली असता अजून गुन्हा दाखल झाला नाही एवढेच उत्तर त्यांच्याकडून सांगण्यात येत होते.

No comments:

Post a Comment