खंबाटकीचे साकडे पवारांना, वाईचे उपसभापती अनिल जगताप यांनी घेतली दिल्लीत जाऊन भेट - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, February 6, 2019

खंबाटकीचे साकडे पवारांना, वाईचे उपसभापती अनिल जगताप यांनी घेतली दिल्लीत जाऊन भेट





सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
...................................................
वेळे : दिल्ली येथे खा. शरद पवार साहेब यांची भेट घेऊन नविन खंबाटकी बोगद्याच्या भूसंपादनाबाबत वाई पंचायत समितीचे उपसभापती अनिल जगताप यांनी पवार साहेबांसोबत चर्चा केली. यावेळी वाण्याचीवाडी, खंडाळा, वेळे व इतर गावातील शेतकर्‍यांच्या अडचणी खा. शरद पवार साहेबांना सांगितल्या.
राष्ट्रीय महामार्गासाठी  खंडाळा तालुक्यातील वाण्याचीवाडी, खंडाळा, वेळे गावच्या शेतजमिनींचे नव्या बोगद्यासाठी भूसंपादन करत असताना बरेचजण भूमिहीन, अल्पभूधारक होणार आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. प्रकल्प महत्वाचा आहे त्याचप्रमाणे शेतकर्‍यांचे हित पाहणे महत्वाचे आहे. नवा खांबाटकी बोगदा होणे आवश्यक असले तरी त्यासाठी होणार्‍या भूसंपादनात शेतकर्‍यांना योग्य मोबदला दिला पाहिजे. जमिनींचे गुंठ्याला दिलेले दर कमी असल्याने प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा. अधिकार्‍यांनी भूसंपादन करताना शेतकर्‍यांबद्दल संवेदनशीलता  दाखवावी. महामार्गालगतचा 500 मीटर परिसर धरून प्रतिगुंठा 10 लाख रुपये दर शेतकर्‍यांच्या जमिनीला मिळावा, अशा विविध मागण्या शेतकर्‍यांच्या वतीने अनिल जगताप यांनी पवार साहेबांकडे केल्या.
   पवार साहेबांनी शेतकर्‍यांच्या बाजूने उभे राहून प्रकल्प बाधित शेतकर्‍यांना योग्य तो न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

No comments:

Post a Comment