खंबाटकी घाटात ऍसिडचा टँकर पलटी भीषण अपघात - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, February 7, 2019

खंबाटकी घाटात ऍसिडचा टँकर पलटी भीषण अपघात


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
खंबाटकी घाट उतरताना ब्रेक निकामी होऊन ऍसिडने भरलेला टँकर पलटी झाला. हा अपघात सकाळी 8.30 वाजता झाला.मात्र या अपघातातून चालक व क्लिनर थोडक्यात बचावले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, एम.एच.43 यू 4260 हा नायट्रिक ऍसिडने भरलेला टँकर मुंबईहून उटी येथे चालला होता. खंबाटकी घाट उतरत असताना या टँकरचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे चालक नियाज अहमद (वय33, उत्तरप्रदेश) यांचे गाडीवरील नियंत्रण सुटून हा टँकर एका वळणावर पलटी झाला. क्लीनर शाहनवाज खान (वय 22, भोपाळ) व चालक नियाज अहमद हे दोघेच या टँकरमध्ये होते. सुदैवाने हा टँकर दरीत कोसळला नाही. नाहीतर याची भीषणता अधिक तीव्र झाली असती.
टँकर पलटी झाल्यामुळे त्यात असणारे नायट्रिक ऍसिड बाहेर येऊन मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला. 
या अपघाताची माहिती मिळताच भुईंज पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पुढील अनर्थ टाळण्यासाठी त्यांनी खंबाटकी घाटातील वाहतूक बंद करून योग्य ती खबरदारी घेतली. टँकरमध्ये ज्वलनशील नायट्रिक ऍसिड असल्याने आग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापुढे अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.

No comments:

Post a Comment