मोबाईल दुकानदाराचे ‘राजपथा’वर अतिक्रमण - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, March 12, 2019

मोबाईल दुकानदाराचे ‘राजपथा’वर अतिक्रमण


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

सातारा: राजपथावर राजलक्ष्मी टॉकीजशेजारी नव्याने सुरु झालेल्या एका दुकानदाराने चक्क राजपथावर अतिक्रमण केले आहे. पालिकेच्या अतिक्रमण पथकाला हे अतिक्रमण दिसत नाही का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.



आपल्या सातव्या शाखेचे मोठ्या थाटात उद्घाटन केल्यानंतर या दुकानदाराने मोबाईलची जाहिरात करण्यासाठी दीड फूट बाय 5 फुटांचे मोठे चौकोनी बोर्ड रस्त्यावर लावले आहेत. त्यामुळे येथे दुचाकी पार्किंगला अडथळा निर्माण होत आहे. हे विनापरवाना लावलेले फलक पालिकेच्या अतिक्रमण पथकाला दिसत नाहीत का? असा सवाल वाहनधारकांमधून उपस्थित होत आहे. वाहतूक शाखेची क्रेन दिवसभरात 50 वेळा येथून जाते त्यांना हे बॉक्स बोर्ड दिसत नाहीत का? एखादी दुचाकी नो पार्किंगमध्ये असेल तर ती तातडीने क्रेनवर चढवली जाते मग या बड्या दुकानदारांना वेगळा न्याय का?

No comments:

Post a Comment