सुजय विखेंपाठोपाठ रणजितसिंह मोहिते पाटीलही भाजपच्या गळाला? - सत्य सह्याद्री

ठळक

Tuesday, March 12, 2019

सुजय विखेंपाठोपाठ रणजितसिंह मोहिते पाटीलही भाजपच्या गळाला?


सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक धक्कादायक घडामोडी पहायला मिळत आहेत. माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्यानंतर, माढ्याचे विद्यमान राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. 


रणजितसिंह यांचा जर भाजपप्रवेश झाला तर हा मोहिते पाटलांसह राष्ट्रवादीला मोठा धक्का आहे.आज रणजितसिंह मोहिते पाटलांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजनांची भेट घेतली , विखेंपाठोपाठ मोहिते पाटील भाजपच्या गळाला लागले का ? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.


रणजितसिंह मोहिते पाटील हे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे ते सुपुत्र आहेत.रणजितसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. २००९  ते २०१२  या कालावधीत रणजितसिंह हे राज्यसभेत होते.शिवाय, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते अध्यक्षही होते. राज्यसभेसोबतच त्यांनी विधानपरिषदेतही प्रतिनिधित्त्व केले होते.


No comments:

Post a Comment