माढ्याचा तिढा ! शरद पवार घेणार निवडणूक रिंगणातून माघार ? - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, March 11, 2019

माढ्याचा तिढा ! शरद पवार घेणार निवडणूक रिंगणातून माघार ?



सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क पुणे :-  माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली होती. मात्र आता ते माघार घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा विचार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे करत आहेत. परंतु माढ्यातून शरद पवारांनीच निवडणूक लढवावी असा आग्रह माढा मतदारसंघातील नेत्यांनी शरद पवारांना पुन्हा केला आहे. 



एकाच घराण्यातील तीन उमेदवार नको म्हणून पवारांचा निवडणुकीतून माघार घेण्याचा विचार असल्याची माहिती आहे. माढ्यातून शरद पवार यांच्या नावाला होणारा विरोध, पार्थच्या उमेदवारीचा आग्रह आणि पुलवामा हल्ल्यानंतर बदललेली राजकीय समिकरणं यामुळे शरद पवार माघार घेतील, अशी चर्चा आहे. बारामतीमधून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी निश्चित आहे, तर मावळमधून पार्थ पवार उमेदवारीची मागणी त्यामुळे शरद पवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेण्याचं ठरवलं आहे.



मात्र शरद पवारांनीच माढ्यातून निवडणूक लढवावी यासाठी नेते आग्रही अहेत. सभापती श्रीमंत रामराजे निंबाळकर, आमदार प्रभाकर घार्गे, दीपक चव्हाण, भारत भालके, शेकापचे गणपतराव देशमुख यांची शरद पवार यांच्याबरोबर बैठक सुरू असून या सर्व नेत्यांनी शरद पवार यांना पुन्हा आग्रह केला आहे. त्यामुळे शरद पवार आता काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे. पुण्यातील बारामती हॉस्टेलवर माढ्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु आहे. शरद पवार या बैठकीला उपस्थित आहेत. 

1 comment:

  1. In Tamilnadu we request the party High command to give up the opportunity to party persons to contest in the upcoming the parliamentary Election

    ReplyDelete