पडळ येथील अपघातात एक ठार एक जखमी - सत्य सह्याद्री

ठळक

Wednesday, March 27, 2019

पडळ येथील अपघातात एक ठार एक जखमी


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क


मायणी :- मायणी-म्हसवड रोडवर पडळफाटा येथे बोलेरो पिकअप व दुचाकी यांची धडक झाल्याने एकजण जागीच ठार झाला तर एकजण जखमी झाला. 


याबाबत सविस्तर वृत्त असे की शहाजी नाना गुरव व नंदकुमार किसन गुरव दोघे रा म्हसवड दुचाकी नंबर एम एच ११ ए आर ३०४३ वरून भूषनगड येथे रक्षाविसर्जनासाठी निघाले होते. पडळ फाटा येथे आल्यानंतर बोलेरो पिकअप नंबर एम एच १४ जी यु ९६६७ या गाडीने दुचाकीस धडक दिली यामध्ये दुचाकीवर पाठीमागे बसलेले नंदकुमार यांना छातीला व डोक्याला मार लागल्याने जाग्यावर ठार झाले तर दुचाकी चालक शहाजी हे जखमी झाले. नंदकुमार गुरव हे नातेवाईकाच्या विधीसाठी म्हसवड येथून भूषणगड ता. खटाव येथे दुचाकीवरून जात होते. दरम्यान पडळ फाटा येथे पिक अपने ठोकरले. या मध्ये ते डांबरी रस्त्यावर पडले. यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार लागला यातच त्यांचा मृत्यू झाला. तर या आपघातात  मोटारसायकल चालक शहाजी गुरव गंभीर जखमी झाला असुन त्याच्यावर मायणी येथे उपचार सुरु आहेत .


या घटनेने म्हसवड शहरात एकच खळबळ उडाली असुन या अपघाताची खबर शहरात पसरताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. नंदकुमार गुरव ( खडकीकर ) हे भुषणगड ता. खटाव येथे म्हसवडहुन एका नातेवाईकाच्या तिसर्याच्या विधीसाठी  दुचाकीवरुन निघाले होते. त्यांच्यासोबत शहाजी गुरव ( लांबोळे ) हे दुचाकी चालवत होते त्यांची दुचाकी कुकूडवाड खिंडीच्या पायथ्याला असलेल्या पडळफाट्याच्या चौकात पडळवरुन  येणाऱ्या भरधाव पिकअपने म्हसवडहुन मायणीकडे निघालेल्या दुचाकीस उजवीकडून जोरदारपणे धडक बसुन झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेले नंदकुमार गुरव हे डांबरी रस्त्यावर पडले यामध्ये त्यांच्या मेंदुला गंभीर इजा झाल्याने ते जागेवरच मयत झाले.तर  मोटारसायकल चालवणारे शहाजी गुरव हे या धडकेत गंभीर जखमी झाले त्यांना मायणी येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत  या अपघाताचे वृत्त म्हसवड शहरात समजताच अनेकांनी अपघातस्थळी नगराध्यक्ष तुषार विरकर माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा कैलास भोरे यांनी धाव घेतली. तर भुषणगड येथे तिसऱ्याच्या विधीला गेलेले म्हसवड येथील सर्व नातेवाईक घटनास्थळी गेले होते.


त्यांच्या निधनामुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असुन त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, ३ मुली १ मुलगा, भाऊ असा मोठा परिवार आहे. नंदकुमार गुरव हे अत्यंत बोलके व मनमिळावू स्वभावाचे प्रखड विचार सरणीचे होते सिध्दनाथ देवस्थानचे पूजारी  म्हणून परिचित होते.या घटनेची खबर त्यांची आई व पत्नी मुलीना समजताच फोडलेला हंबरडा  अनेकांचे डोळे पाणवले. मयत नंदकुमार गुरव यांचा मृत्युदेह मायणी येथील आरोग्य केंद्रात नेला त्याठिकाणी त्यांच्या मृत्युदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. म्हसवड येथील वैकुंठ स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

No comments:

Post a Comment