कोयनानगर येथील ठिय्या आंदोलन ४० दिवसानंतर स्थगित - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, March 24, 2019

कोयनानगर येथील ठिय्या आंदोलन ४० दिवसानंतर स्थगित


समन्यायी विकासाच्या मुद्द्यावर सरकार सकारात्मक -डॉ भारत पाटणकर,*
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
पाटण :समन्यायी विकास, सर्वांचा विकास या सूत्रानुसार  श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कोयनानगर सह राज्यातील 7जिल्हातील 13 ठिकाणी सुरू असलेले प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन मंत्रालयात पार पडलेल्या सकारात्मक बैठकीनंतर तब्बल 40 दिवसानंतर स्थगित करण्यात आल्याची घोषणा डॉ भारत पाटणकर यांनी पंढरपूर येथील प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्यात केली, 
 त्यानुसार कोयनानगर येथे दि 12 फेब्रुवारीपासून पाटण तालुक्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांचे दुसऱ्या टप्प्यातील बेमुदत ठिय्या आंदोलन ,
 शनिवार दिनांक 23 रोजी रात्री उशिरा डॉ. भारत पाटणकर यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून ठिय्या आंदोलन मागे घेण्याचा ठराव मांडला त्यास उपस्थित कोयना प्रकल्पग्रस्त जनतेने हात वर करून संमती दिली,
यावेळी बोलताना डॉ. भारत पाटणकर म्हणाले की आत्ताच्या आंदोलन गेल्या वर्षीच्या आंदोलनापेक्षा वेगळे होते गेल्या वर्षांच्या आंदोलनात ज्या मागण्या मंजूर केल्या त्याची अंमलबजावणी करायची होती त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या  वाॅररुम  मध्ये मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त प्रधान सचिव यांच्यासमवेत 20 तारखेला बैठक झाली, त्या बैठकीस उर्जा, ग्रामविकास, वनविभाग, पुनर्वसन, पाटबंधारे आदी विभागाचे मुख्य सचिव उपस्थित होते,
प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न हे युद्ध पातळीवर सोडवायचे असल्याने त्या ठिकाणी बैठक ही मुख्यमंत्र्यांच्या पातळीवरील मुद्द्यांची बैठक झाली,श्रमिक मुक्ती दलाच्या समन्यायी विकास सर्वांचा विकास या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली, 
विकासाच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली त्यामुळे प्रकल्पग्रस्त जनतेसाठी विकासाची सर्व दारे खुली झाली हा निर्णय श्रमिक मुक्ती दलाच्या चळवळीतील ऐतिहासिक पुढचा टप्पा आहे, आतापर्यंतच्या संघर्षातील 
हे सर्वात मोठे यश आहे, समन्यायी विकास सर्वांगीण विकास हे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वाची एकजूट महत्त्वाची ठरली असून त्यामुळे मोठे यश प्राप्त झाले आहे, शेतकरी, कष्टकरी जनतेचे जीवनमान सुधारण्यासाठी हाच राजमा आहे, समन्यायी विकासाचे हे मॉडेल राज्याला व देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाईल,प्रकल्पग्रस्तांना जमीनी, जमिनींना पाणी, स्थानिक जनतेला स्वयंरोजगार,उद्योगनिमिॅती ,निर्वाहभत्ता, घरबांधणी अनुदान, नागरी सुविधा या समन्यायी विकासाच्या मुद्द्यावर सरकार सकारात्मक असल्याचे डॉ भारत पाटणकर यांनी सांगितले,   
तसेच सातारा जिल्ह्यातील तारळी, उरमोडी ,वांग-मराठवाडी, कोयना धरणग्रस्तांच्या जुन्या प्रलंबित प्रश्नांबाबतच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी व श्रमिक मुक्ती दल यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली,
यावेळी धरणग्रस्तांच्या प्रलंबित विषयांच्या अंमलबजावणीसाठी कालबद्ध कार्यक्रम ठरवून सर्वांगीण विकासासाठी आवश्यक कार्यवाहीची सकारात्मक चर्चा झाली,पात्र प्रकल्पग्रस्तांची अंतिम संकलन याद्या तयार असल्याचे यावेळी सांगितले, 

त्यानुसंघाने जिल्ह्यातील कोयनानगर सह इतर ठिकाणी गेले 40 दिवस बसलेल्या धरणग्रस्तांचे ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे यावेळी डॉ भारत पाटणकर यांनी सांगितले, 
यावेळी श्रमुदचे राज्य कार्यकारिणी सदस्य हरिश्चंद्र दळवी, शलाका पाटणकर, चैतन्य दळवी, तालुकाध्यक्ष संजय लाड, महेश शेलार, सचिन कदम,श्रीपती माने, डी डी कदम, संतोष गोटल, सिताराम पवार,दता देशमुख, यांच्यासह हजारो प्रकल्पग्रस्त उपस्थित होते, 

फोटो - कोयनानगर आंदोलनात मार्गदर्शन करताना डॉ भारत पाटणकर

No comments:

Post a Comment