सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
........................................
सातारा : सोमवारी सुरुचि बंगल्यावर नगरविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी आता भाजमध्ये जाण्याचा धोशा लावल्याने शेवटी आमदारांनी सर्वांना ‘तुम्ही म्हणाल तसं’, असं सांगत भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यामुळे आता हा प्रवेश नक्की झाल्याचे मानले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षाकडून सन्मानाची वागणूक व न्याय मिळत नसल्याने सातार्याचे आमदार शिवेंद्रसिंह भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन निवडणूक लढवावी, असा आग्रह समर्थक व कार्यकर्त्यांकडून गेले काही महिन्यांपासून सुरु आहे.
शिवेंद्रसिंह यांचे निवासस्थान सुरुची येथे सोमवारी शिवेंद्रसिंहराजे यांचे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करावा असा जोरदार आग्रह धरला. येत्या विधानसभा निवडणुकीत खा. उदयनराजे भोसले आपले काम करणार नाहीत, अशी खात्री शिवेंद्रसिंह यांच्यासह कार्यकर्त्यांची झाली असल्याने आमदारांचा भाजपप्रवेश जवळपास निश्चित झाला असून आता केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे.
भाजपचे प्रमुख नेते व गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये प्रवेश करतील, असे एका कार्यकर्त्याने सांगितले.

0 Comments