सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
शाहूपुरी: मुख्यमंत्री उदयनराजेंचे मित्र आहेत. ते त्यांच्या वाढदिवसालाही आले होते. मग तेव्हाच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करायला हवा होता, अशी टिप्पणी करत माजी आमदार शिवेंद्रसिंह भोसले यांनी सातारची नगरपालिका थोरल्यांकडे आहे, त्यांचे आणि आमचे किती प्रेम आहे, हे तुम्हाला माहितीच आहे, अशा शब्दांत शहरातील विकासकामांबाबतची अगतिकताही व्यक्त केली.
येथील हास्य क्लब तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या बैठकीत ते संवाद साधताना बोलत होते. शहरातील विकासकामांच्या प्रस्तावावर जलमंदिरमधून फोन आल्याशिवाय सीओंना सह्या करण्याचा अधिकार नाही, याचीही माहिती घ्या, असे सांगत नगरपालिकेच्या कारभारावर न बोललेलेच बरे, असे नमूद करत त्यांनी पालिकेवरही टीका केली. नगराध्यक्ष बाई मला नुसतेच हो म्हणतात, आणि करत काही नाही तर उपनगराध्यक्ष किशोर शिंदे चौकात हाताची घडी घालून उभे असतात, त्यांना कामाचे काय विचारा अशी टीकाही त्यांनी केली.

0 Comments