Hot Posts

6/recent/ticker-posts

सातारा जिल्ह्यात आचार संहिता उल्‌ल्ंघनाचे गुन्हे, रोख रक्कम आणि मद्य जप्त

 
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
सातारा; सातारा आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन होण्यासाठी जिल्ह्यात 39 फिरती पथके, 37 स्थिर पथके, 9 व्हीव्हीटी तर 37 व्हीएसटी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने सिव्हीजल ॲपवर 13, टोल फ्री क्रामांकावर 1 व लिखित 1 अशा एकूण 15 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात आले. आज अखेर याबाबत कोणतेही तक्रार प्रलंबित नाही, अशी माहिती आचारसंहिता कक्षाचे प्रमुख तथा अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सांगितले आहे.
स्थिर व फिरत्या पथकाद्वारे 255 फलटण मतदारसंघात बेकायदेशीर जमाव रॅली काढल्याबद्दल 1 एफआयआर , 257 कोरेगाव व 256 वाई मतदारसंघामध्ये दारुबंदी अधिनियमांतर्गत प्रत्येकी 1 एफआयआर असे एकूण 3 एफआयआर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. या पथकांकडून 2 लाख 76 हजार 308 रुपये रोख जप्त करण्यात आले. यामध्ये पोलिस खात्यामार्फत 1 लाख 84 हजार 308 तर पथकाद्वारे 92 हजार रोख जप्त करण्यात आले. तर 16 लाख 35 हजार 750 रुपये किमतीचे 4579.77 लि. मद्य जप्त करण्यात आले. यामध्ये पोलिसांकडून 2012.62 लि. रक्कम रुपये 4 लाख 42 हजार 21 तर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 12 लाख 14 हजार 408 रुपयांचे 2846.17 लि. मद्य जप्त करण्यात आले. या प्रकरणामध्ये पोलिसांकडून 81 तर राज्य उत्पादन विभागाकडून 64 अशा एकूण 145 एफआयआर दाखल करण्यात आले.

Post a Comment

0 Comments