Hot Posts

6/recent/ticker-posts

माणला वंचितकडून डॉ.प्रमोद गावडेना उमेदवारी


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
म्हसवड:
आगामी विधानसभा निवडणुकीत माण -खटाव या मतदारसंघात सध्या गावोगावी राजकीय वर्तुळात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची चर्चा जोरात सुरु होती  वंचितच्या उमेदवारीमुळे काँग्रेस राष्ट्रवादी भाजप-सेनेलाही लोकसभेला मोठा फटका बसला होता येणार्‍या विधानसभेला  वंचित आघाडीचे उमेदवार म्हणून डॉ. प्रमोद गावडे यांना जाहीर झाली असून त्याची  लढाई भाजपा सेना यांच्या बरोबर आमचं ठरलंय यांच्या बरोबरच राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
आगामी विधानसभा निवडणुकीत धडा शिकवण्यासाठी वंचीत आघाडी निर्णायक ठरणार असून उमेदवारी साठी सात उमेदवारांनी पुणे येथेेे मुलाखती दिल्या होत्या त्यामध्ये म्हसवड येथील डॉ. प्रमोद गावडे, अजीनाथ केवटे, घोलप, बाळासाहेब रणपिसे आदी इच्छूक असून माण-खटाव या दोन्ही तालुक्यात ओबीसी, धनगर, बौध्द ,मातंग, मुस्लिम आदी बांधवाची मतदार संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने येणार्‍या विधानसभेत वंचित भल्याल्यांची गणिते बदलणार आहेत.
डॉ प्रमोद गावडे म्हणाले, भाजप सरकारने ज्याप्रमाणे धनगर समाजाची फसवणूक केली तसीच फसवनूक काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने करुन आरक्षणाच्या नावाने मते मिळवून बोळवन करून  माण -खटाव या मतदारसंघातील मुख्यत्वे   पाणी प्रश्न, शेतीवर आधारित उद्योग वाढीला प्राधान्य देणार आहे.माण तालुक्यात वैद्यकीय सुविधा गरिबांना मिळण्यासाठी  वैद्यकीय दवाखाना  म्हसवड, दहिवडी, शिखर शिंगणापूर येथे उभारणार आहे.
माण ,खटाव या दोन्ही तालुक्यात औद्योगिक वसाहत उभारण्यात येणार आहे.माण,खटाव हे तालुके डाळिंब व कांदाच्या उत्पादनासाठी बाजारपेठ निर्माण केली जाणार आहे.दुष्काळ भागात वैद्यकीय शिक्षणांची संस्था उभारण्यात माण खटाव या तालुक्यात रेल्वेचे जाळे उभारण्यात येणार आहे. माण मतदार संघात मेंढपाळ व्यवसायचे प्रमाण आधिक असताना मेंढ्या, शेळ्यां, जनावरांची, बाजारपेठ निर्माण करणार आहे. तरुण पिढीला शिक्षणाचा वापर स्वतःच व्यवसाय सुरू कसा करावा यावर अधिक भर देणार अशी इच्छा व्यक्त केली आहे. माण तालुका हा पिढ्यानपिढ्या दुष्काळाशी झगडणार्‍या माणदेशात सर्वसामान्या भेडसावणार्‍या आरोग्यपासून सर्व च प्रश्नांच्या सोडवुणकीसाठी आविरत कष्ट करणार्‍याच्या पाठीमागे उभा राहण्यासाठी व त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी माझी उमेदवारी असुन वंचितच्या पदाधिकार्‍यांना बरोबर घेऊनच पुढील दिशा ठरवणार असल्याचे वंचितचे उमेदवार डॉ प्रमोद गावडे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments