सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
औंध :अवैध
सावकारीच्या माध्यमातून लाखो रुपयांची माया गोळा करणार्या बारा खाजगी
सावकारांपैकी दोन जण अटकेत असून बाकी दहा जण फरार असून त्यांच्या मुसक्या
आवळण्यासाठी पोलीस तपास करीत आहेत.
सन
2015ते 2020 या सुमारे पाच वर्षाच्या काळात पुसेसावळी येथील खाजगी सावकार
किरण नारायण लोहोरा, संजय किसन जाधव,संदिप ऊर्फ सचिन उत्तम कदम,सतीश
रामचंद्र जाधव,अरुण लवळे,पोपट गोसावी, सचिन गोसावी,अक्षय त्रिंबके,साहिल
बागवान,अकबर मुल्ला, संदीप कुंदप सर्व रा.पुसेसावळी व दत्तात्रय पिसाळ
रा.बोरगाव ता.तासगाव जि.सांगली यांनी विक्रांत भंडारे रा.वडगांव
(ज.स्वा.)ता.खटाव यांना वेळोवेळी त्रास देऊन
पैसे
व व्याजाची अवाच्या सव्वा मागणी करून त्यांचा मानसिक व शारिरीक छळ
केला.घराची नोटरी करून घेतली ,दुकान जाळून टाकण्याची धमकी दिली .त्यामुळे
या
त्रासाला
कंटाळून विक्रांत भंडारे यांनी औंध पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली.
यामधील सचिन गोसावी याला न्यायालयीन कोठडी मिळाली तर किरण लोहोरा हा वडूज
पोलिसांच्या ताब्यात आहे अन्य दहा संशयित दोन दिवसांपासून फरार आहेत.
सपोनि उत्तम भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

0 Comments