सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटण: गेली अनेक दिवस
ढोकेश्वर मल्टिस्टेट अर्बन को- ऑप क्रेडिट सोसायटीच्या ठेवीदारांचे पैसे
परत मिळत नसल्याने अनेकांनी लेखी व तोंडी तक्रारी दिल्या होत्या, त्या वरून
संबंधित संस्थेच्या चेअरमन व इतर संचालक यांच्या विरोधात विविध ठिकाणी
गुन्हे दाखल करण्यात आले होते, ढोकेश्वर मल्टिस्टेट अर्बन को-आॅप- क्रेडीट
सोसा. लि.नाशीक या सोसायटी चे चेअरमन सतिश पोपटराव काळे रा.लासलगांव
जि.नाशीक यांना नाशीक येथून ताब्यात घेवून अटक करण्यात आली असल्याची माहिती
पोलीस निरीक्षक प्रताप पोमन यांनी दिली आहे.
या
बाबत फलठण शहर पोलिसांनी दिलेली माहीती अशी फलटण शहर पो. ठाण्याकडे
फिर्यादी नामे पांडुरंग विठोबा बनकर रा. निंबळक यांनी दिलेल्या
फिर्यादीवरुन पोलीस ठाण्याकडे गुन्हा दाखल होता. त्यामध्ये १ लाख ४० हजार
रुपयांची फिर्यादीची फसवणूक झाली होती. त्यामध्ये शाखेचे मॅनेजर धन्यकुमार
माने रा.सातारा व चंदुलाल भरणे व सतिश पोपटराव काळे रा नाशीक
यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर पतसंस्थेविरुध्द
महाराष्ट्र मध्ये वेगवेगळया ठिकाणी १७ गुन्हे दाखल आहेत व ३० ते ४० कोटीचा
अपहार रक्कम आहे. सतिश काळे या हा या गुन्हात मुख्य आरोपी होता
याला सदर गुन्हयामध्ये काल अटक करण्यात आली असून २ दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली आहे.
फलटण
शहर व तालुक्यामध्ये सदर पतसंस्थेच्या फलटण शाखेमध्ये कोणी फिक्स डिपाॅजीट
व अन्य प्रकारे गुंतवणुक केली असल्यास व त्यांची फसवणूक झाली. असल्यास
फलटण शहर पोलीस ठाण्याकडे संपर्क करण्याचे अहवान पोलीसांतर्फे करण्यात येत
आहे. सदर गुन्हाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बनकर हे करीत आहेत.

0 Comments