Hot Posts

6/recent/ticker-posts

आईच्या खूनप्रकरणी ५ महिन्यापासून फरारी असलेल्या आरोपीस अटक

















 

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटण :-  चौधरवाडी येथील दत्तनगर  शेतवस्तीवर राहणार्‍या आरीफा रशीद शेख वय- ४५ वर्षे  या महिलेचा राहते घरी खून झाला होता. खून झाल्यानंतर मयत महिलेचा  मुलगा सुलतान रशीद शेख वय -३० वर्षे हा फरार झाला होता. तो अंत्यविधीला सुद्धा हजर नव्हता. गेली पाच महिने तो फरार होता. काल दि 5 रोजी सुलतान शेख हा फलटण शहरामध्ये बारामती रोडवर येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर फलटण शहर पोलिसांनी त्याठिकाणहून त्याला ताब्यात घेतले.

 सुलतान शेख यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने त्यांच्या आईचा खून केल्याची कबुली दिली. आईची वर्तणुक चांगली नसल्याने व तिला दारुचे व्यसन असल्याने रागाचे भरात भांडणामध्ये कुर्‍हाडीने खून केल्याचे सांगितले.  सदरची कारवाई उपविभागीय पोलीस आधिकारी,फलटण तानाजी बरडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, पोलीस हवा.विद्याधर ठाकूर, पोलीस काॅं . सुजित मेंगावडे, नितिन चतुरे, शरद तांबे व सर्जेराव सूळ यांच्या पथकाने केली. सदर खुनाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप पोमण हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments