Hot Posts

6/recent/ticker-posts

शेंद्रे गटात १ हजार किलो गोडेतेल वाटप, ॲड.विक्रम पवार यांचा उपक्रम


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
शेंद्रे:  कोरोनाला आळा घालण्यासाठी शासनाच्या वतीने संचारबंदी लागु करण्यात आली आहे.त्यामुळे लोकांना घराबाहेर पडता येत नाही.घरामध्ये लागनार्‍या जीवनावश्यक वस्तू आनने सुद्धा अवघड झाले आहे.त्यामुळे जिल्हा परिषद शेंद्रे गटातील पठार विभागात डोंगरावर असनार्‍या तसेच इतर गावांतील लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.या सर्व अडचणींचा विचार करुन गरजु लोकांना दिलासा देण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा बाजार समितीचे सभापती ॲड.विक्रम पवार यांनी जिल्हा परिषद शेंद्रे गटातील पठार विभागातील कौंदणी,नरेवाडी,वरची पिलानी, परमाळे ,बेंडवाडी या प्रत्येकि गावात तसेच शेंद्रे येथील कातकरी समाज यांना घरटी एक किलो प्रमाणे  रोजच्या दैनंदिन जीवनात स्वयंपाक करताना आवश्यक असनार्‍या गोडे तेलाचे वाटप केले.तसेच बोरगाव येथील गरजु लोकांना एक क्विंटल गहु व एक क्विंटल तांदळाचे वाटप करण्यात आले. रोजच्या दैनंदिन जीवनात स्वयंपाकामध्ये तेल हा गरजेचा खाद्य पदार्थ आहे. लोकांना या अडचनीच्या काळात विक्रम पवार यांनी केलेल्या या वाटपामुळे ग्रामस्थांच्याकडुन कौतुक करण्यात येत आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने लॉकडाऊन वाढवल्याने अनेक लोकांचा रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्हा परीषद शेंद्रे गटातील पठार विभागातील तसेच इतर गावांतील बहुतांश लोक कामानिमित्त मुंबईला असतात.परंतु या लॉकडाऊन मुळे त्यांच्याही रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने दैनंदिन गरजा भागविणे सुद्धा लोकांना अवघड झाले आहे.याचीच दखल घेऊन सभापती विक्रम पवार यांनी पुढाकार घेऊन पठार विभागातील गावांना गोडेतेलाचे वाटप करण्यात आले.गत वर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये सुद्धा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून विक्रम पवार यांनी पठार विभागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली होती. अशा प्रकारे सातत्याने अडचनीच्या वेळी सभापती विक्रम पवार यांच्या वतीने शेंद्रे गटातील लोकांना मदत होत असल्याने शेंद्रे गटातील लोक त्यांचे कौतुक करत आहेत.
शेंद्रे गटातील गरजु लोकांना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती मदत देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत मदत पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल.
- ॲड.विक्रम पवार.
सभापती सातारा बाजार समिती.

Post a Comment

0 Comments