Hot Posts

6/recent/ticker-posts

चरेगाव येथे सापडला कोरोना पॉझिटीव्ह









चरेगाव : येथील सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत. (छाया : रघुनाथ थोरात )
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
उंब्रज: कराड तालुक्यातील चरेगाव येथील 30 वर्षीय युवकास कोरोना ची लागण झाल्याचे रविवार दि. 19 रोजी उघडकीस आल्यानंतर चरेगावसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गावात येणारे रस्ते पूर्णतः बंद करून प्रशासनाने गावाच्या सिमा सील केल्या आहेत. 
    हा युवक पुणे येथे निगडी परिसरातील एका कंपनीत काम करत होता. तो दि. 26 मार्च रोजी चरेगाव ता. कराड या आपल्या मुळगावी आला होता. सदरचा युवक चरेगाव येथे राहत्या घरी वास्तव्यास होता. पुण्याहून आल्यानंतर तपासणीसाठी सदर युवकाने 27 मार्च रोजी उंब्रज येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून त्याच्या नावाची नोंद करून तपासणी ही करून युवकास प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी होम क्वारंटाईन केले होते. 
                 दरम्यान, दि. 16 एप्रिल रोजी सदर युवकास घशात दुखण्याचा त्रास जाणवत असल्याने उंब्रज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यास कराड येथील उपजिल्हा ररूग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, सदर युवकाचे स्वॅप पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या तपासणी अहवालात सदर युवकास कोरोना ची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर चरेगावचरेगावसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 
            सध्य परिस्थितीत चरेगावात येणारे सर्व रस्ते पोलीस प्रशासनाने बंद करून गाव सील करून सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. तसेच गावातील ग्रामस्थांनी घराबाहेर न पडण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. 
            दरम्यान, रविवारी दुपारी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदिप वाकडे, पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, उंब्रजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. संगीता देशमुख यांनी चरेगाव येथे भेट देऊन पाहणी केली तसेच ग्रामस्थांना सूचना केल्या.

Post a Comment

0 Comments